रामचंद्र नाईक विद्यालयाचे अभिमानाचे २५ वर्ष..    25th YEARS OF THE PRIDE OF RAMCHANDRA NAIK SCHOOL

President's Message

Pandit Deendayal Upadhyay Education Society, Chhatrapati Sambhajinagar has been working in the field of education since 1980, In Chhatrapati Sambhajinagar and Jalna districts, four talukas as well as in Chhatrapati Sambhajinagar metropolis, 33 Sanskar Kendras are being run. The institute has one Senior college, six Junior colleges, six primary and upper primary schools, six pre-primary schools, two ashram schools and two Hostels, 8000 students are studying in it. Out of which Ramchandra Naik School is a Pre-Primary to Std.10 Semi English Medium Sanskar Kendra in Cidco N – 4, area of ​​Chhatrapati Sambhajinagar city. Inspired teachers and non-teaching staff are working in this organization with the aim of developing holistic personality on the basis of devotion to the nation and society. In the light of Bharatiya Jeevan Darshan presented by Pandit Deendayal Upadhyay’s Ekatma Manav Darshan, the organization has structured the education system.The organization is working tirelessly to create a quality education system for the common man.

"पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर ही शिक्षण संस्था शैक्षणिक क्षेत्रात सन 1980 पासून कार्यरत असून छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हयातील चार तालुके तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरात शिक्षणाची 33 संस्कार केंद्रे संस्था चालवित आहे, संस्थेचे एक महाविद्यालय 07 कनिष्ठ महाविद्यालय,10 माध्यमिक विद्यालय, सहा प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय, सहा पूर्व प्राथमिक विद्यालय दोन आश्रम शाळा व दोन वसतिगृह असून त्यात आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यातीलच छत्रपती संभाजीनगर शहरातील स्पंदन नगर, सिडको एन – 4 ( दक्षिण ) या भागात रामचंद्र नाईक विद्यालय, हे पूर्व प्राथमिक ते इयत्ता 10 पर्यंतचे सेमी इंग्रजी माध्यमाचे  हे एक संस्कार केंद्र आहे. राष्ट्र व समाज भक्ति-भावाच्या अधिष्ठानावर समग्र व्यक्तिमत्व विकास घडविण्याच्या ध्येयाने प्रेरित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या संस्थेत कार्यरत असून एकात्म मानव दर्शन या पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या भारतीय जीवन दर्शनाच्या प्रकाशात शिक्षण व्यवस्थेची संरचना संस्थेने केलेली असून समाजातील सामान्य घटकांसाठी दर्जेदार शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी संस्था अखंड कार्यरत आहे."

मा. श्री हरिभाऊ बागडे

आमदार, फुलंब्री मतदार संघ तथा
अध्यक्ष, पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था,
छत्रपती संभाजीनगर ,महाराष्ट्र.

News & Events

View All >>

Our Motivator's

Our Toppers

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2023 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शाळेच्या आठव्या बॅचचाही मागील सर्व बॅचप्रमाणे 100 % निकाल. इयत्ता 10 वी चे सर्वच विद्यार्थी हे 65 टक्केपेक्षा जास्त टक्केवारीने उत्तीर्ण, 75 टक्केपेक्षा जास्त 41 विद्यार्थी व 90 टक्केपेक्षा जास्त गुण संपादन करुन 12 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, त्यातीलच विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या पहील्या दहा विद्यार्थ्यांचे छायाचित्रे त्यांच्या गुणांच्या टक्केवारीसह येथे देण्यात आलेली आहेत.

Our Gallery

विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित अध्ययन- अध्यापनाबरोबर संस्कार केंद्रामध्ये विविध उपक्रम घेतले जातात. नेतृत्वगुणास चालना देणे, आपले विचार निर्भीडपणे मांडण्याचे कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये संघभावना वाढीस लावणे, एकंदरीत विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक,भावात्मक आणि बोधात्मक या तीनही क्षेत्राचा विकास करणे हा मानस ठेवून शाळा नियमित सहशालेय उपक्रमांचे आयोजन करत असते. यामुळे एकंदरीत “ Joyful Learning “ म्हणजे आनंददायी शिक्षण पद्धती राबविली जाते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.

View All >>

Recent Activities

Annual Prize Distribution Day 2024

Annual Prize Distribution Day 2024

19 FEBRUARY 2024

Std-10th Send Off 2024

Std-10th Send Off 2024

28 FEBRUARY 2024

Annual Function Day 2024

Annual Function Day 2024

5 FEBRUARY 2024

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by

sterydy online