“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

शाळेच्या‌ रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ” आपले कुटूंब ” ही थीम असणाऱ्या २५ व्या ( सत्र-२) वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन..

5 FEBRUARY 2024

शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या अंतर्गत ” आपले कुटूंब ” ही थीम असणाऱ्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र दुसरे हे इ.२ री ते इ.५ वी या वर्गासाठी संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण १५ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपले कुटूंब या थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच कौटुंबिक संदेशपर नाट्यछटांचा तसेच समाजातील विविध चुकीच्या चालीरीतीना कशाप्रकारे आपण बदलवू शकतो या प्रकारचा संदेश देणाऱ्या विविध नाट्यछटांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे तसेच सृजनशील समाज निर्मिती व्हावी हा मानस ठेवून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by