26 जून 2025 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा मानस ठेवून शालेय जिवनात महत्त्वाचे असलेले हस्ताक्षर हे सुंदर असावे म्हणून सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . सुंदर हस्ताक्षर हा एक प्रकारचा दागिनाच आहे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच सुंदर हस्ताक्षराची गोडी लागावी. तसेच या स्पर्धेच्या युगात स्पर्धेला न घाबरता स्पर्धेसाठी तयार राहणे तसेच कुठेही मागे न राहता प्रत्येक स्पर्धेत सहभागी होणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
श्रीगणेश चतुर्थी याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण मानला जातो.संपूर्ण भारत आणि जगातील काही प्रांतात तो साजरा केला जातो. 19 व्या शतकात भारतीय स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळक यांनी 1892 मधील सार्वजनिक विरोधी असेंब्ली कायद्याद्वारे हिंदू मेळाव्यांवरील वसाहतवादी ब्रिटीश सरकारने घातलेल्या बंदीपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचे आवाहन केले.शाळेत All true Happiness, Pure joy, sweet bounties and untroubled pleasure lies in the knowledge of God and love of God; they cannot exist without them.याप्रमाणे इ.05 ते 09 वी च्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्तीचे पर्यावरण पुरक फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच दरवर्षीप्रमाणे 27 ऑगस्ट 2025 रोजी शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी व उपप्रतिनिधीनी बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली व शाळेतील या उपक्रमात 100 % विद्यार्थ्यांनी प्रतिसाद घेतला. शाळेत विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या गणेश मूर्तीची घरी स्थापना करून घरीच विसर्जन करण्यात आले. काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…
शाळेत Victory Is In The Quality Of Competition And Not The Final Score या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेत 04 ते 11 फेब्रुवारी या दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील असलेल्या क्रीडा कौशल्याला वाव देणे . तसेच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये असलेल्या क्रीडा क्षेत्रातील विविध संधींची जाणीव करून देणे तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. सांघिक खेळातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना तसेच राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव करून देणे हा माणस ठेवून शाळेने संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वयानुसार स्पर्धांचे दोन गटात विभाजन करण्यात आले जसे की प्राथमिक व माध्यमिक विभाग त्यात प्रामुख्याने खालील स्पर्धांचा समावेश करण्यात आला.
स्पर्धेचे नाव:-
१] कब्बडी
२] खो-खो
३] बुध्दिबळ
४] क्रिकेट
५] तीन पायांची शर्यत
६] चमचा लिंबू
७] संगीत खुर्ची
स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…
Today's
Visitors
Total
Visitors
Last
Updated: