नियम 1 | |
शालेय शिस्त… | |
1.1 | पालकांकडून शालेय शिस्तीचे पालन होणे अपेक्षित आहे, जेंव्हा शाळा विद्यार्थ्यास चांगल्या सवयीं (स्वच्छता, वेळेचे बंधन, सत्यता, ज्येष्ठांचा आदर इ.) लागाव्या म्हणुन यांच्या बाबतीत आवश्यक सूचना देतात, तेंव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेला निर्णय, आदेश हा अंतिम असेल, त्यावर कुठलीही चर्चा केली जाणार नाही. जेंव्हा मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही अनियमितता वाटेल तेंव्हा शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते योग्य ती सूचना, आदेश, निर्णय देऊ शकतात. त्या विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक व बंधनकारक असतील. |
1.2 | परिपाठातील राष्ट्रगीत संपल्यानंतर उशिराने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यास त्या दिवसाकरिता शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. |
1.3 | रजा मंजुरीशिवाय विद्यार्थी जर अनुपस्थित राहिला, तर त्यास योग्य त्या कारणासाठी आवश्यक वैद्यकिय प्रमाणपत्र शाळेत उपस्थित होतांनी सादर करावे लागेल. रजा मंजुरीशिवाय विद्यार्थी मर्यादेपेक्षा जास्त दिवस अनुपस्थित राहिल्यास त्याला पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. |
1.4 | शाळेच्या अधिकृत दीनदयालीयन ॲप मधील सर्व नोंदी तसेच सूचना पालकांनी नियमित वाचाव्यात व समजुन घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी. |
1.5 | पालकांनी विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेत घेतल्या जाणार्या सर्व शालेय, सहशालेय उपक्रमात विद्यार्थ्याचा सहभाग नोंदवावा व शाळेने दिलेल्या सुचनेनूसार होणार्या प्रत्येक पालक सभेस उपस्थित राहुन आपल्या पाल्याच्या अभ्यासाविषयक प्रगतीचा आढावा घेणे बंधनकारक आहे. |
1.6 | शाळेत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेतल्या कोणत्याही कर्मचार्यांशी गैर वर्तवणूक करु नये, आपले म्हणणे शाळेच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तिकेत लेखी स्वरुपात नोंदवावे, कोणत्याही पालकाने शालेय परिसरात कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन शाळेच्या कोणत्याही कर्मचार्यांसोबत केले, तर सदरील विद्यार्थ्याचा प्रवेश शाळेतून तात्काळ रद्द करण्यात येईल. |
1.7 | मधल्या सुटीतील जेवणाबाबत (शाळा प्रत्यक्ष सुरु असतांना) मधल्या सुटीतील जेवणात पालेभाज्यायुक्त, कडधान्ययुक्त भाजी व पोळी असावी, अन्य “फास्ट फूड, जंकफुड’’,बिस्कीटे, तळलेले, तयार खाद्यपदार्थ ( बाजारातील ), चॉकलेटस् इत्यादी पदार्थ विद्यार्थ्यासोबत पाठविण्यास पूर्णपणे प्रतिबंध आहे व “प्लास्टिकचा डबा’’ वापरण्यास पूर्णपणे प्रतिबंध आहे तसेच पाण्यासाठी केवळ बंद (लेस) असलेली वॉटर बॉटलच अनिवार्य आहे. प्रत्येक शनिवारी आवश्यक वाटल्यास विद्यार्थ्याच्या आवडीप्रमाणे घरी तयार केलेले खाद्यपदार्थ देऊ शकता. |
1.8 | शाळेत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेतल्या कोणत्याही कर्मचार्यांशी गैर वर्तवणूक करु नये, आपले म्हणणे शाळेच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तिकेत लेखी स्वरुपात नोंदवावे, कोणत्याही पालकाने शालेय परिसरात कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन शाळेच्या कोणत्याही कर्मचार्यांसोबत केले, तर सदरील विद्यार्थ्याचा प्रवेश शाळेतून तात्काळ रद्द करण्यात येईल. |
1.9 | शाळेत उशिराने आलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला जाऊ शकतो याची नोंद सर्व पालकांनी घ्यावी. |
1.10 | विद्यार्थी आजारी असल्यास विद्यार्थ्यांस शाळेत पाठवु नये त्यासाठी नियम क्रमांक 13 प्रमाणे कृती करावी. |
नियम 2 | |
पालकांसाठी विशेष सूचना… | |
2.1 | वैयक्तिक स्वच्छता करणे, नियमित नखे काढणे, स्वच्छ कपडे/गणवेश घालणे या चांगल्या सवयी पाल्याला लावणे गरजेचे आहे, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. |
2.2 | पाल्याला स्वत:ची कामे स्वत: करण्यासाठी लहानपणापासून सवय लावा. |
2.3 | पाल्याला शाळेत नियमितपणे आणि वेळेवर पाठवा. नियोजित वेळेपेक्षा पाच मिनीटांपेक्षा जास्त उशिर होणार नाही याची दक्षता घ्या. |
2.4 | पाल्याला रोज एक तास त्याच्या वयाला अनुरुप खेळ खेळण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी. |
2.5 | शाळेतील सहशालेय उपक्रम, अभ्यास या विषयी दररोज माहिती घ्यावी व आवश्यकता वाटल्यास वर्गशिक्षकांना प्रत्यक्ष शाळा सुटल्यानंतर भेटून माहिती घ्यावी. |
2.6 | घरचा अभ्यास रोज दिला जातो. त्यासाठी पाल्याला रोज किमान दोन-तीन तास अभ्यासाला बसवा. |
2.7 | टी.व्ही., मोबाईल इंटरनेट व सोशल मिडिया वापरावर नियंत्रण ठेवा, परंतु शैक्षणिक तसेच ज्ञान वाढविणारे कार्यक्रम ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी उत्तेजन द्या. विद्यार्थ्यांना किमान आठवड्यातून 3 दिवस ऐकून लिहिणे (श्रृतलेखन) सराव घ्यावा. |
2.8 | जेवतांना सर्व पदार्थ खाण्याची विद्यार्थ्यास सवय लावा. डब्यात फक्त पोळी भाजीच देणे आवश्यक आहे. |
2.9 | एखादा छंद जोपासण्यासाठी आपल्या पाल्याला वेळ देवून मदत करा. |
2.10 | घरात आणि घराबाहेर इतरांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्याला प्रेरित करा. |
2.11 | आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या व्यक्तिंसोबत आदराने वागण्याची पाल्यास सवय लावा. |
2.12 | शाळा सुटल्यानंतर शाळेत येऊन शिक्षकांची भेट घ्या. आपल्या पाल्याच्या प्रगतीविषयी त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा व चर्चेनंतर सूचविलेली योग्य ती उपाययोजना अंमलात आणा. |
2.13 | सर्व परीक्षांचे एकूण संपादित गुण मिळुन निकाल तयार होतो, तरी प्रत्येक परीक्षेत उपस्थिती आवश्यक आहे. |
2.14 | शाळेत दररोज दिलेला अभ्यास, स्वाध्याय पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी सर्वस्वी पालकांची आहे. |
2.15 | आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शिक्षकांना नियोजित वेळेतच भेटणे आवश्यक असेल. |
2.16 | शाळेच्या प्रशासनाकडून येणार्या सूचना, प्रगती पुस्तके, वह्या याकडे वेळोवेळी योग्य लक्ष देवून येणार्या अडचणी सोडवाव्यात. |
2.17 | शाळा व आपले घर यात सुसंवाद निर्माण होईल असा जाणीवपूर्वक प्रयत्न असावा. |
2.18 | शाळेच्या अधिकृत दीनदयालीयन ॲपच्या माध्यमातून आपल्या पाल्याचा शैक्षणिक विकासाचा ताल व तोल सांभाळण्यास मदत होणार आहे, या जाणीवेने या उपक्रमाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या |
2.19 | रजेबाबत लेखी अर्ज मंजुर करुन घेणे आवश्यक आहे. तीन दिवसापर्यंतचा वर्ग शिक्षकांकडे व त्यापेक्षा जास्त दिवसापर्यंतची रजा हवी असेल तर मुख्याध्यापकांकडून मंजुर करून घ्यावी. रजेचा अर्जाचा नमुना शाळेच्या अधिकृत संकेतस्थ्ळावर दिलेला आहे, त्यावरून स्वतंत्र कागदावर अर्ज लिहावा व तो प्रत्यक्ष शाळेत भेटून ती मंजुर करुन घ्यावी.तसेच आजारी वा अस्वस्थ विद्यार्थ्याचा सुटीचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची विहित कार्यपद्धती नियम क्र .13 मध्ये दिलेली आहे. |
2.20 | विद्यार्थ्याला शाळेत आणुन सोडणे व शाळा सुटल्यानंतर परत घेऊन जाणे यांची संपूर्ण जबाबदारी पालकांची असेल, दरम्यानच्या काळात विद्यार्थी गहाळ झाल्यास शाळा प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही. |
2.21 | कुठलीही तक्रार तोंडी न करता ती लेखी स्वरुपात तक्रार पुस्तिकेत शाळेत प्रत्यक्ष येऊन करणे बंधनकारक आहे. |
2.22 | शाळेकडुन विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत सूचना आल्यास त्वरीत त्या बाबीचे निराकरण करावे. |
2.23 | विद्यार्थ्यांने स्वच्छताविषयक सर्वच चांगल्या सवयीचे पालन करणे बंधनकारक असेल. |
2.24 | शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शाळेने ठरवुन दिलेल्या जसे की मुलांसाठी शाळेला शोभेल [ शाळेच्या शिस्तीला अनुसरुन ] अशी असावी.तसेच मुलींसाठी शाळेने ठरवुन दिलेल्या रिबीन परीधान करणे बंधनकारक असेल. |
महत्वाचे – | विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक नियम तसेच बाबी या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे. |
शाळेने विद्यार्थ्यांना दिलेल्या ओळखपत्राच्या दोन रंगाच्या लेसचा अर्थ | |
RED लेस – | न्यू हनुमान नगर ,पुंडलिक नगर, जयभवानी नगर ,विश्रांती नगर, न्यू गणेश नगर तसेच मातोश्री नगर इत्यादी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत दुचाकी आणता येणार नाही. |
GREEN लेस – | रेडलेस असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिसरा व्यतिरिक्त परंतु शाळेने परवानगी दिलेल्या पालकांना शाळेत दुचाकी आणता येईल परंतु त्यासाठी शाळेने दुचाकी वापरासंबंधीचे ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन तंतोतंत करणे बंधनकारक असेल. |
नियम 3 | |
दीनदयालियन या अॅपच्या वापरासंबंधी… | |
3.1 | दीनदयालियन हे अॅप विद्यार्थ्याच्या दोन्हीं पालकांनी (आई व वडील) यांनी सुरु करुन घेणे आवश्यक आहे. ते अॅप सूचना वही (शालेय दैनंदिनी) चे काम करेल. प्रत्येक दिवशी त्यामध्ये अभ्यास दिला जाईल. दिवसातून एकदा पालकांनी ते पहाणे आवश्यक आहे. |
3.2 | वर्गात दररोज दिला जाणारा अभ्यास त्या-त्या विषयाचे शिक्षक दीनदयालियन अॅपवर टाकतील (पोस्ट करतील) तो विद्यार्थ्यांनी दिलेल्या दिनांकात पालकांकडून समजुन घेऊन अॅपवर दिलेले वर्गपाठ/स्वाध्याय/ अभ्यास त्याच दिवशी पुर्ण करणे अपेक्षित आहे.. |
3.3 | पालकांनीही दररोज आपल्या पाल्याचे दीनदयालियन अॅप नियमित तपासुन आपल्या पाल्याने शाळेत दिलेला अभ्यास पूर्ण केला आहे की नाही? याची खात्री करावी. पालकांनी अभ्यास पाहिल्यास त्याची नोंद आपोआप शिक्षकांकडे जाते. |
3.4 | पालकांनी “शिक्षकांकडून, शाळेकडून दिल्या जाणार्या अभ्यासविषयक व इतर सूचना’’ दीनदयालियन अॅपवर नोटीस किंवा सर्क्युलर या टॅबमध्ये नियमित पहाव्यात, आपल्या पाल्याच्या अभ्यासाबाबत सूचना आल्यात की नाही? याची दररोज पाहुन खात्री करावी व अभ्यासाबाबत व अन्य कारणांसाठी सूचना आलेली असल्यास त्या सुचनेबाबत आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, आई व वडिल दोघांनीही अभ्यासाबाबत सूचनांकडे लक्ष देणे अनिवार्य आहे. |
3.5 | दीनदयालियन या अॅपचा दररोज आढावा घ्यावा, एकदाच दोन-तीन दिवसातून अॅप ओपन करुन पाहु नये, तर प्रत्येक दिवशी अभ्यास व सूचनाबाबतची खात्री करावी. |
3.6 | पालकांनी दीनदयालियन अॅपचा वरीलप्रमाणे योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या फारशा अडचणीं येणार नाहीत व विद्यार्थ्याच्या अभ्यासातील प्रगतीत सातत्यपूर्ण वाढ होईल. |
3.7 | अॅपमध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे (दप्तराचे ओझे कमी करण्यासाठीचे वेळापत्रक) दप्तर भरावे किंवा विद्यार्थ्यास दप्तर भरावण्यास सांगावे. |
3.8 | अॅपमध्ये दिल्याप्रमाणे विद्यार्थ्याने बनविलेल्या स्वतःच्या दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थी / पाल्य वागतो का ? याची खात्री पालकांनी वेळोवेळी करावी व वेळापत्रकाचे पालन करण्यास सांगावे. |
Student Activity Club ( विद्यार्थी छंद वर्ग ) | |
3.9 | या वर्गात आपल्या पाल्यास सहभागी करावयाचे संमती पत्राचा नमुना अॅपमध्ये दिलेला आहे. त्यावरुन तो शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पूर्ण करुन दिल्यास ते शैक्षणिक वर्षापुरते बदलता येणार नाही वा त्यात कोणताही बदल करता येणार नाही. |
नियम 4 | |
विद्यार्थ्यास शाळेत आणुन सेाडणे व परत घेऊन जाणेबाबत … | |
4.1 | विद्यार्थ्याला शाळेत आणुन सोडणे व शाळेतुन घेऊन जाणे ही नामनिर्देशित पालकांची जबाबदारी असेल. |
4.2 | विद्यार्थ्याला शाळेत सोडतांना जर पालक मोटारसायकल किंवा अन्य वाहन घेऊन येत असेल तर आपले वाहन शाळेने ठरवून दिलेल्या जागेवरच व्यवस्थित उभे करावेत व तेथुन विद्यार्थ्यास सोबत घेवून सोडावे व शाळा सुटल्यानंतरही वरीलप्रमाणेच कृती करावी. |
4.3 | शाळेचा संपूर्ण परीसर हा शासन नियमांनुसार सी. सी. टी. व्ही. कॅमेराच्या निगराणीखाली कायम आहे व असतो हे लक्षात ठेवुनच पालकांनी शालेय परिसरात वावरावे. |
4.4 | शालेय परिसरात शाळेच्या शिपाई / सुरक्षा रक्षकाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन पालकांनी करणे बंधनकारक आहे. |
4.5 | शाळा हे संस्कार केंद्र असल्याने शालेय परिसरात शालेय वातावरणाला शोभेल असे वर्तन ठेवावे बोलतांनी संयमाने व हळु आवाजात बोलावे आपला विषय योग्य पद्धतीने पूर्ण तयारी करूनच मांडावा. |
4.6 | शालेय परीसरात किंवा शाळेच्या बाहेरील आवारात शासन नियमानूसार पालकांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करुन येऊ नये किंवा सदरील पदार्थ शालेय परिसरात सोबतही बाळगु नयेत. |
4.7 | जर शाळेने विद्यार्थी सोडण्याची व परत घेऊन जाण्याची जागा निश्चित केलेली आहे, त्याच ठिकाणी विद्यार्थ्यास सोडावे व तेथूनच विद्यार्थ्याला परत घेऊन जाणे बंधनकारक आहे. |
4.8 | शाळेने नियमानूसार पालकांना थांबण्यासाठीची जागा निश्चित करुन दिलेली आहे, त्याच ठिकाणी पालकांनी थांबने अनिवार्य आहे, शालेय व्यवस्थेत अडसर येणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. |
4.9 | शाळा भरतांना व सुटतांना विद्यार्थ्याला सोडायला किंवा घ्यावयाला आलेल्या पालकांनी शाळेच्या क्रीडांगणावर नेहमी डाव्या बाजूनेच तयार केलेल्या पाथवे वरुनच चालावे, क्रीडांगणाच्या मध्यभागातून जाऊ नये. |
4.10 | विद्यार्थ्याला शाळेत सोडण्यासाठी वा परत घेण्यासाठी जर कोणत्याही वाहनांचा उपयोग करावयाचा असल्यास, ती व्यक्ती 18 वर्षाखालील नसावी व त्याच्याकडे शासन नियमांप्रमाणे वाहन चालवण्याचा योग्य तो परवाना असावा, अल्पवयीन व्यक्तीने जर शाळेत वाहन आणल्यास त्यावर योग्य ती पोलीस कारवाई करण्यात येईल. |
4.11 | फक्त दुपार सत्रातील महिलांसाठी शाळेत शाळेच्या गेट क्रमांक २ ला दुपार सत्रातील शाळा सुटताना पार्किंगची व्यवस्था आहे. कृपया दुपार सत्रातील परवानाधारक ( लायसन्स ) महिला पालकांनी आपली दुचाकी त्याच ठिकाणी पार्किंग करावी. विनापरवानाधारक महिलांनी आपली दुचाकी शाळेत आणू नये. |
4.12 | शाळेत केवळ नामनिर्देशन फॉर्मवर नावे व स्वाक्षरी असलेले व्यक्तीच येऊ शकतात अन्य कोणालाही परिसरात प्रवेश करता येणार नाही. |
4.13 | शाळेत येणाऱ्या प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीला स्वत:चे फोटो असलेले ओळखपत्र शाळेत येतांना प्रत्येक वेळी सोबत ठेवणे बंधनकारक आहे, आवश्यकतेनूसार शाळा ते तपासू शकते. |
4.14 | नामनिर्देशित व्यक्तीला शाळेत येतांना शालेय वातारणाला साजेसे पोशाख परिधान करणे आवश्यक असेल, कोणत्याही प्रकारे व्यवस्थेला चालणार नाहीत अश्या पोशाखात आल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो. |
4.15 | विद्यार्थ्याला सोडतांना वा घेतांना वेळेचे बंधन नेहमीसाठी पाळावे लागेल फार लवकर वा फार उशिरा शाळेत येता येणार नाही. |
4.16 | सर्वांची योग्य माहिती व पत्ता शाळेकडे आहे, त्यामुळे नव्याने काहि सांगण्याची व माहिती घेण्याची शाळेला आवश्यकता नाही. |
4.17 | वरील नावे असलेल्या परिसराबाहेर वास्तव्य करणाऱ्या पालकांचे पत्ते तपासले जातील व योग्य कारणांचा शोध घेण्यात येऊन त्यांना पुढील वर्षीबाबत स्पष्ट सूचना देण्यात येतील. |
4.18 | कोणत्याही कारणास्तव शाळेत वाहनांवर येणाऱ्या पालकांना महिला असो व पुरुष वाहन चालविण्याचा परवाना( लाईसन्स ) नेहमीसाठी बंधनकारक आहे, त्याशिवाय कोणीही शाळेत वाहनांवर येऊ नये. |
4.19 | न्यू हनुमान नगर ,पुंडलिक नगर, जयभवानी नगर ,विश्रांती नगर, न्यू गणेश नगर, मातोश्री नगर या परिसरातील पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत सोडणे व शाळा सुटल्यानंतर घेऊन जाण्यासाठी दुचाकी किंवा इतर वाहनांचा वापर करता येणार नाही त्यांनी पायीच विद्यार्थ्यांना आणून सोडणे व शाळा सुटल्यानंतर घेऊन जाणे बंधनकारक असेल. |
4.20 | वरील भाग वगळता शाळेने परवानगी दिलेल्या पालकांनाच दुचाकी शाळेत विद्यार्थ्याला आणून सोडणे व शाळा सुटल्यानंतर घेऊन जाण्यासाठी शाळेने ठरवुन दिलेल्या अटींची पूर्तता केल्यानंतर शाळेत विद्यार्थ्याला आणून सोडणे व शाळा सुटल्यानंतर घेऊन जाण्यासाठी दुचाकीचा वापर करता येईल. |
4.21 | नामनिर्देशित व्यक्तीला शाळेत येताना शाळेच्या शालेय वातावरणाला साजेसा पोशाख परिधान करून येणे बंधनकारक असेल कोणत्याही प्रकारचा व्यवस्थेला न चालणारा पोषक परिधान केल्यास शाळेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो. |
शाळेत विद्यार्थ्याला आणून सोडणे व घेऊन जाण्यासाठी दुचाकी वापरासंबंधीचे नियम… | |
4.22 | केवळ परवाना धारक पालकच शाळेत दुचाकी घेऊन येऊ शकतात तसेच स्वतःचा वाहन परवाना / लायसन्स नेहमी सोबत बाळगणे बंधनकारक असेल. |
4.23 | शाळेने परवानगी दिलेल्या पालकांनी आपल्या वाहन परवान्याची एक साक्षांकित प्रत काढून त्यावर आपण वापरत असलेल्या वाहनाचा क्रमांक तसेच चेसीज क्रमांक लिहून आपल्या पाल्याच्या नामनिर्देशित फॉर्मसोबत जोडून शाळेत जमा करणे बंधनकारक असेल. |
4.24 | शासनाने वेळोवेळी लागू केलेले वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक असेल. जसे की हेल्मेट वापरणे इत्यादी |
4.25 | शाळेत येणाऱ्या प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीला स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र शाळेत येताना प्रत्येक वेळी सोबत ठेवणे बंधनकारक आहे आवश्यकतेनुसार शाळा ते तपासू शकते. |
महत्वाचे- | या सर्व नियमांचा मुख्य व अंतिम उदेद्श केवळ शिस्त व सर्व नियमांचे पालन करणाऱ्या पालकांच्या पाल्यांनाच चांगल्या दर्जाचे व उत्तम शिक्षण देणे हाच आहे. |
नियम 5 | |
मुख्याध्यापकांना भेटावयाची विहीत कार्यपद्धती … | |
5.1 | अभ्यासाविषयी, अन्य कारणास्तव मुख्याध्यापकांची भेट घ्यावयाची असल्यास रितसर त्यांची वेळ घेणे बंधनकारक असेल, त्यासाठी पालकांनी वर्गशिक्षकांना भेटून त्यांच्यामार्फत मुख्याध्यापकांची वेळ घ्यावी. |
5.2 | पालकांनी केलेल्या सूचना वर्गशिक्षक समजून घेतील, वर्गशिक्षकच मुख्याध्यापकांची वेळ घेऊन अॅपमधील नोटीस या टॅबमध्ये लेखी सूचना देऊन वेळ देतील, त्याप्रमाणे नामनिर्देशित पालकांनी आवश्यक माहितीसह शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यास त्यांच्या शंकेचे निराकरण मुख्याध्यापक करतील. |
5.3 | पालकांना एकदा मुख्याध्यापक भेटीची वेळ दिल्यानंतर ठरलेल्या वेळीच पालकांनी शालेय परिसरात येऊन शाळेचे शिपाई वा सुरक्षा रक्षक यांना माहिती द्यावी तद्तर बोलावल्यानंतरच मुख्याध्यापकांना भेटता येईल व आवश्यक ती बाब पूर्ण करता येईल. |
5.4 | शाळा सुरु असतांना वेळ न घेता अचानक मुख्याध्यापकांना पूर्व परवानगी शिवाय कधीही भेटता येणार नाही. |
नियम 6 | |
शिक्षक/ वर्गशिक्षकांना भेटण्याची विहीत कार्यपद्धती … | |
6.1 | पाल्याच्या अभ्यासाविषयी चर्चा करण्यासाठी वा अन्य कारणांसाठी वर्गशिक्षक/ शिक्षक यांना भेटण्यासाठी दररोज सकाळ सत्रासाठी, सकाळ सत्रातील शाळा सुटतांना व दुपार सत्रासाठी दुपार सत्रातील शाळा सुटल्यानंतर 5 मिनीटांनी भेटता येईल. |
6.2 | उपरोक्त वेळेव्यतिरिक्त नियमित शाळा सुरु असतांना व शिक्षक वर्गात अध्यापनाचे कार्य करत असतांना कोणत्याही परिस्थितीत वर्गशिक्षक / शिक्षक यांना भेटता येणार नाही. |
नियम 7 | |
शंकावही ( Doubt Notebook) चा वापर करण्याबाबतची विहित कार्यपध्दती… | |
7.1 | या शाळेत दैनंदिन अभ्यास दिला जातो व विद्यार्थ्यांने तो नियमित पूर्ण करून वेळापत्रकाप्रमाणे संबंधीत वर्ग / विषय शिक्षकांकडून तपासून घेणे अपेक्षित आहे. |
7.2 | दैनंदिन शाळेत शिकविलेला अभ्यास घरी करतांना एखाद्या विषयाचा काही भाग / प्रश्न न समजल्यास तो भाग त्या दिवशीच्या दिनांकात शंका वही ( Doubt Notebook ) मध्ये नमुद करुन प्रथम विद्यार्थ्याने व नंतर पालकाने खाली दिलेल्या नमुन्यात आखणी करुन त्यावर स्वाक्षरी करुन शंका वही विद्यार्थ्यासोबत द्यावी. |
7.3 | शाळेच्या नंतरच्या दिवशी शेवटच्या तासिकेत वा शाळा सुटल्यानंतर विषयाशी संबंधित वर्गशिक्षक वा विषय शिक्षक शाळेत विद्यार्थ्याला तो भाग पुन्हा समजावून सांगतील व पूर्ण समजल्यानंतरच तेथे लाल रंगाच्या पेनाने दिनांकीत स्वाक्षरी करतील, पालकांना शंकेचे निरसण होईपर्यंत म्हणजे साधारण 15 ते 30 मिनिटे वेटिंग खूर्चीवर थांबावे लागेल. |
7.4 | वर्षभर नियमित वा कोणत्याही परीक्षेच्या निकालाच्या वेळी विद्यार्थ्यांनी वा पालकांनी शंका वही सोबत ठेवणे अनिवार्य असेल. |
7.5 | शंकावही ( Doubt Notebook) मध्ये फक्त अभ्यासासंबधीच्या शंकाच लिहल्या जातील अन्य सर्व गोष्टींच्या बाबतीत नियमावली पहावी. |
शंकावही ( Doubt Notebook) आखण्यासाठीचा आवश्यक नमुना
अ.क्र. | दिनांक | न समजलेला घटकाचे / पाठाचे नाव | विद्यार्थ्याची स्वाक्षरी | पालकांची स्वाक्षरी | शिक्षकांची लाल रंगाच्या पेनाने दिनांकित स्वाक्षरी |
1. | |||||
2 |
नियम 8 | |
ग्रंथालय नियम व प्रक्रिया.. | |
8.1 | वेळापत्रकानुसार वर्गनिहाय ठरलेल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांच्या मागणीनूसार करण्यात येईल. |
8.2 | विद्यार्थ्यास पुस्तक घेतलेल्या दिनांकापासून पुढील सात दिवसांत ते पुस्तक परत करावेच लागेल. |
8.3 | ग्रंथालयातील पुस्तके योग्य रितीने हाताळणे व वेळेत परत करणे ही पूर्णत: विद्यार्थ्याची जबाबदारी असेल. |
8.4 | सात दिवसांनंतर पुस्तक परत केले नाही तर 2 रु. प्रति दिवस या दराने दंड आकारण्यात येईल. |
8.5 | ग्रंथालयाचे पुस्तक जर फाटले किंवा हरवले तर त्या पुस्तकाची पूर्ण किंमत जमा करावी लागेल. |
8.6 | विद्यार्थी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चॉकलेट्स वा अन्य वस्तु न देता शाळेच्या ग्रंथालयास योग्य ते विद्यार्थी उपयोगी व ग्रंथालयास योग्य असे पुस्तक भेट म्हणुन देऊ शकतो मात्र ग्रंथालयास पुस्तक भेट देणे ही बाब पूर्णतः ऐच्छिक स्वरुपाची आहे. |
नियम 9 | |
पालक नामनिर्देशन फॉर्मची उपयुक्तता व कार्यपद्धती… | |
9.1 | प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षात शाळा सुरु झाल्यावर शाळेतुन पालक नामनिर्देशन फॉर्म दिला जाईल. |
9.2 | सदरील फॉर्मवर मुळ पालक व त्यांच्या अनुउपस्थितीत पालक म्हणुन ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा रक्तातील नातेवाईक वा घरातील अन्य कोणत्याही दोन व्यक्तिंची नावे काळजीपूर्वक स्वाक्षरीसह नमुद करावीत. |
9.3 | या पालक नामनिर्देशन फॉर्मवर ज्यांची नावे आहेत फक्त त्यांनाच शालेय परिसरात विद्यार्थ्यास सोडण्यासाठी वा घेण्यासाठी, विद्यार्थ्याचा निकाल पाहण्यासाठी किंवा अर्धवार्षिक पालक सभेला उपस्थित राहता येईल. |
9.4 | एखाद्या वेळी विद्यार्थ्याला शाळा सुरु असतांना घरी घेऊन जायचे असेल तर पालक नामनिर्देशन फॉर्मवर ज्यांची नावे आहेत फक्त त्यांच्याच ताब्यात विद्यार्थ्याला दिले जाईल. |
9.5 | नामनिर्देशित व्यक्तिव्यतिरिक्त इतर कोणालाही त्या विद्यार्थ्या-संबंधाने शालेय परिसरात येता येणार नाही तसेच विद्यार्थ्याच्या बाबतीत कुठलाही हस्तक्षेप करता येणार नाही. |
9.6 | पालक नामनिर्देशन फॉर्मस् मुळे विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीत शाळा तसेच पालकांना मदत मिळते, त्यामुळे त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे बंधनकारक आहे. |
9.7 | नामनिर्देशित व्यक्तिव्यतिरिक्त अन्य कोणाला विद्यार्थ्याला घ्यायला किंवा अन्य कामासाठी शाळेत पाठवयाचे असल्यास मूळ पालकांनी लेखी अधिकारपत्र (अर्ज) सबंधित व्यक्तिजवळ स्वाक्षरीनिशी देणे आवश्यक राहील, अधिकारपत्रातील मुळ पालकांची स्वाक्षरी नामनिर्देशन फॉर्मवरील पालकांच्या स्वाक्षरीशी जुळली म्हणजे त्यांच्यासोबत विद्यार्थ्याला सोडता येईल किंवा त्यांचे म्हणणे समजून घेतले जाईल. |
नियम 10 | |
पालकांना तक्रार करावयाची असल्यास तक्रार करण्याची विहीत कार्यपद्धती …. | |
10.1 | पालक आपल्या पाल्याच्या अभ्यासाबाबत दिलेल्या विहीत वेळेत व शिक्षकांना भेटुन अभ्यासाविषयी नियमित ठरलेल्या वेळेत चौकशी करु शकतात. |
10.2 | पालकांना पाल्याच्या अभ्यासाबाबत अथवा शिक्षकांबाबत काही तक्रार असल्यास केवळ तोंडी तक्रार न करता संबंधित शिक्षकांकडुन कार्यालयात ठेवण्यात आलेल्या “ पालक सूचना /तक्रार रजिस्टर ’’ मागावून घेवुन त्यावर स्वाक्षरीसह नामनिर्देशित पालक तक्रार नोंदवु शकतात. |
10.3 | पालक सूचना / तक्रार रजिस्टर मध्ये दिलेल्या विहीत नमुन्यात पालकांनी आपली लेखी तक्रार नोंदवुन त्यावर स्वाक्षरी करावी. पालक स्वाक्षरी करण्याइतपत साक्षर नसेल तर त्यांनी आपले म्हणणे शिक्षकास तोंडी सांगावे, पालकाच्या सूचनेनुसार शिक्षक तक्रार नोंदवुन घेईल व त्यावर पालकाचा डाव्या अंगठ्याचा ठसा उमटवतील. |
10.4 | तदनंतर संबंधित सूचना / तक्रार रजिस्टर मुख्याध्यापकांकडे सादर केले जाईल व त्यांच्या सूचनेनुसार पालकांना चर्चेसाठी ॲपमध्ये सूचना दिली जाईल. दिलेल्या सूचनेनुसारच पालकांनी दिलेल्या वेळी आवश्यक माहिती, सर्व मुद्यांसह व पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहणे बंधनकारक असेल. |
10.5 | मुख्याध्यापकाने दिलेल्या वेळेत पालक, संबंधित शिक्षक यांची चर्चा होऊन मुख्याध्यापक आपला अंतिम निर्णय पालकांना / शिक्षकांना देतील व संबंधित तक्रारीचे 100% निराकरण करतील व मुख्याध्यापकांचा निर्णय हा अंतिम असेल व तो पाळणे पालक व शिक्षकांना बंधनकारक असेल. |
नियम 11 | |
ओपनहाऊस तथा पालक सभेस उपस्थित राहताना .. | |
11.1 | विद्यार्थी ज्या वर्गात शिक्षण घेत आहे, त्या वर्गाची अर्ध वार्षिक/ वार्षिक पालकसभा माहे ऑक्टोबर / एप्रिल या महिन्यात अनुक्रमे होईल. सदरील पालक सभेत विद्यार्थ्याच्या एकूण शैक्षणिक बाबतीतची वाटचाल, अडचणीं इत्यादी बाबत सविस्तर चर्चा होईल. सदरील पालक सभेस मुळ पालकांनी (आई व वडिल) उपस्थित राहणे अनिवार्य आहे. |
11.2 | शालेय चाचण्या व सत्रपरीक्षेचा ओपनहाऊस ( निकाल ) पाहण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती शालेय गणवेशात असलेल्या विद्यार्थ्यासोबत उपस्थित राहु शकते व विद्यार्थ्याचे पेपर बघून आवश्यक त्या नोंदी घेऊ शकते. |
11.3 | पालक सभेमध्ये पाल्याच्या बाबतीत महत्त्वाच्या सूचना तसेच इतर महत्त्वाची माहिती देण्यात येते, तेंव्हा पालक सभेच्या दिवशी उशिरा न येता ठरलेल्या वेळेच्या पूर्वी किमान 5 मिनिटे अगोदर शालेय परिसरात उपस्थित राहणे आवश्यक असेल. |
11.4 | पालक सभेस वा ओपनहाऊस साठी शाळेत येतांना फक्त मुळ पालकांनीच येणे अपेक्षित आहे, तेंव्हा पालकांनी आपल्या सोबत इतर कोणत्याही व्यक्तींना आणु नये, तसे झाल्यास अन्य व्यक्तीला शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. |
11.5 | पालक सभेमध्ये जर मुळ पालकाला पाल्याविषयी एखादा मुद्दा मांडावयाचा असेल किंवा प्रश्न विचारावयाचा असेल, तर पालकांनी आपला मुद्दा व्यवस्थित व पूर्ण तयारीनिशी व योग्य शब्दात मांडावा. |
11.6 | पालक सभेत केवळ मुळ पालकच एखादा मुद्दा मांडु शकतो. मुळ पालकाशिवाय इतर नामनिर्देशित पालकांना वार्षिक पालक सभेत उपस्थित राहता येणार नाही वा पालक सभेत प्रश्न किंवा आपला मुद्दा मांडता येणार नाही, सभेत कोणत्याही बाबतीत बोलता येणार नाही. |
11.7 | कोणत्याही परीक्षेच्या निकालाच्या वेळी पालक आपल्या पाल्याच्या निकालावर वा अभ्यासातील प्रगतीवर समाधानी नसेल तर ? त्याच दिवशी सबंधित वर्गशिक्षकांना न सांगता घरी गेल्यावर आपल्या पाल्याच्या शंका वही मध्ये पाल्याने कोण-कोणत्या शंका विचारलेल्या आहेत व त्या सर्वांची शिक्षकांनी समाधान केलेले आहे किंवा नाही ? याची पालकांनी प्रथम खात्री करावी. |
11.8 | उपरोक्त प्रमाणे खात्री केल्या नंतरच पालक असमाधानी असल्याबाबतची लेखी सूचना स्वतंत्र कागदावर लिहुन पालकांनी विद्यार्थ्यासोबत पाठवावी. |
11.9 | लेखी सूचना प्राप्त झाल्या नंतर मुळ पालकास लेखी सूचना देवुन आवश्यक त्या माहिती सहशाळेत भेटण्याचा वेळ देऊन बोलविले जाईल, विहित वेळेत पालक शाळेत उपस्थित राहिल्यास त्यांचे समाधान केले जाईल. |
नियम 12 | |
शाळेतून बोनाफाईड तथा प्रवेश निर्गम उतारा मिळण्यासंबंधी | |
12.1 | विद्यार्थी शाळेत प्रवेशित असेल व त्यास कोणत्याही कारणास्तव बोनाफाईड वा प्रवेश निर्गम उतार्याची आवश्यकता असेल तर पालकांनी कोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र हवे आहे त्यासाठी स्वतंत्र अर्ज स्वाक्षरीनिशी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल त्या वर्गशिक्षकांना भेटून त्यांच्याकडे सादर करावा. |
12.2 | पालकांनी वर्गशिक्षकांकडे सादर केलेला अर्ज वर्गशिक्षक शाळा सुटल्यानंतर शाळेच्या कार्यालयात स्टुडंट आय.डी.सह जमा करेल व कार्यालयाकडून दोन दिवसांत आवश्यक ते प्रमाणपत्र प्राप्त करुन ते प्रमाणपत्र तिसर्या दिवशी विद्यार्थ्यासोबत देईल. |
नियम 13 | |
आजारी वा अस्वस्थ विद्यार्थ्याचा सुटीचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची कार्यपद्धती…. | |
13.1 | विद्यार्थी आजारी असल्यास पालकांनी तीन दिवसांपर्यंतचा सुटीचा अर्ज शाळेत येऊन देण्याची आवश्यकता नाही. |
13.2 | ही सुट फक्त आजारी विद्यार्थ्यांसाठी आहे, अन्य कोणत्याही कारणांसाठी ही सुट लागू नाही. |
13.3 | पालकांनी विहित नमुन्यात कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत आजारी रजा हवी तो कालावधी नमूद करुन परिपूर्ण कारणांसहित अर्ज लिहावा व त्यावर पालकांनी स्वाक्षरी करावी. |
13.4 | अर्जाचा योग्य फोटो काढून घ्यावा तदनंतर शाळेच्या अधिकृत दीनदयालियन ॲपवरील Leave Application वर जाऊन रजेचा योग्य पर्यांय निवडून Reason For Leave मध्ये सविस्तर कारण नमूद करावे. |
13.5 | रजा कोणत्या दिनांकापासून रजा हवी आहे तो दिनांक तेथे नमूद करावा तसेच किती दिवसांची रजा हवी आहे ते दिवसही तेथे नमूद करावेत. |
13.6 | पालकांनी लिहलेला अर्जाचा फोटो सोबत Add करुन अर्ज शाळेकडे Forward करावा. |
13.7 | जेव्हा विद्यार्थी स्वस्थ झाल्यावर प्रत्यक्ष शाळेत येईल तेव्हा तोच पाठविलेला अर्ज तेव्हा विद्यार्थ्यास आपल्या वर्गशिक्षकांकडे जमा करण्यास सांगावे. |
13.8 | सदरील कार्यपद्धती फक्त आणि फक्त ज्यादिवशी सुटी हवी आहे त्याच्या आधल्या दिवशीच ( Before ) लागू असेल. |
13.9 | आधी सुट्टी घेऊन नंतर ऑनलाईन अर्ज करता येणार नाही व तो ग्राहयही धरला जाणार नाही, ऑनलाईन अर्ज फक्त आजारी या कारणासाठीच आहे. |
पालकांनी प्रत्यक्ष भेटून सादर करावयाच्या सुट्टीच्या अर्जाच्या कार्यपद्धतीबाबत…. | |
13.10 | तीन दिवसापर्यंतचा सुट्टीचा विहित नमुन्यातील अर्ज सुट्टी हवी असलेल्या दिनांकाच्या एक दिवस अगोदर वर्गशिक्षकांना प्रत्यक्ष भेटून पूर्वपरवानगीने मंजूर करून मगच सुट्टी ग्राह्य धरावी. |
13.11 | तीन दिवसापेक्षा जास्त सुट्टी हवी असल्यास त्यासंबंधीचा विहित नमुन्यातील अर्ज सुट्टी हवी असलेल्या दिनांकाच्या एक दिवस अगोदर मा. मुख्याध्यापक सरांना प्रत्यक्ष भेटून पूर्वपरवानगीने मंजूर करून घेऊन मगच सुट्टी ग्राह्य धरावी |
13.12 | मा.मुख्याध्यापक सरांना प्रत्यक्ष भेटून तीन दिवसापेक्षा जास्त सुट्टीचा अर्ज द्यावयाचा असल्यास सर्वप्रथम याची कल्पना संबंधित वर्गशिक्षकांना द्यावी. |
13.13 | आपला निरोप वर्गशिक्षक मा.मुख्याध्यापक सरांना देतील. तसेच त्यानंतर मा. मुख्याध्यापक सरांनी आपणास वर्गशिक्षकामार्फत दिलेल्या वेळेतच आपण आपला विहित नमुन्यातील अर्ज मा. मुख्याध्यापक सरांकडे सादर करावा. |
13.14 | विनापरवानगी मा. मुख्याध्यापक सरांना भेटता येणार नाही याची पालकांनी नोंद घ्यावी. |
13.15 | वैद्यकीय कारण वगळता अन्य कोणत्याही कारणांसाठी प्रत्यक्ष भेटूनच अर्ज देणे आवश्यक आहे, याची पालकांनी नोंद घ्यावी. |
मयत किंवा दुःखद घटना या कारणासाठीचा सुट्टीचा अर्ज करण्यासाठीची कार्यपद्धती……. | |
13.16 | विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांमध्ये कोणी मयत झाले असल्यास किंवा काही दुःखद घटना घडल्यास सुट्टीचा अर्ज शाळेत येऊन देण्याची आवश्यकता नाही. |
13.17 | ही सूट फक्त मयत किंवा दुःखद घटना या कारणासाठीच लागू आहे. |
13.3 | पालकांनी विहित नमुन्यात कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत आजारी रजा हवी तो कालावधी नमूद करुन परिपूर्ण कारणांसहित अर्ज लिहावा व त्यावर पालकांनी स्वाक्षरी करावी. |
13.18 | अर्जाचा योग्य फोटो काढून घ्यावा तदनंतर शाळेच्या अधिकृत दीनदयालियन ॲपवरील Leave Application वर जाऊन रजेचा योग्य पर्यांय निवडून Reason For Leave मध्ये सविस्तर कारण नमूद करावे. |
13.19 | रजा कोणत्या दिनांकापासून रजा हवी आहे तो दिनांक तेथे नमूद करावा तसेच किती दिवसांची रजा हवी आहे ते दिवसही तेथे नमूद करावेत. |
13.20 | पालकांनी लिहलेला अर्जाचा फोटो सोबत Add करुन अर्ज शाळेकडे Forward करावा. |
13.20 | दुखवटा संपल्यानंतर पालकांनी प्रत्यक्ष शाळेत वर्गशिक्षकांमार्फत माननीय मुख्याध्यापक सरांना भेटून दुःखद घटनेच्या कालावधीतील आपली रजा मंजूर करून घ्यावी. |
महत्वाचे:- | वर्गशिक्षकांना भेटून अर्ज देण्यासाठी शाळेने शिक्षकांना भेटण्यासाठी निर्धारित केलेल्या वेळेतच तो द्यावा. जसे की सकाळ सत्रासाठी सकाळ सत्रातील शाळा सुटल्यानंतर पाच मिनिटांनी व दुपार सत्रासाठी दुपार सत्रातील शाळा सुटल्यानंतर पाच मिनिटांनी तो द्यावा. |
नियम 14 | |
शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (टि.सी.) मिळण्यासंबंधी कार्यपद्धती | |
14.1 | विद्यार्थी शाळेत प्रवेशित असेल व त्यास कोणत्याही कारणास्तव शाळा सोडावयाची असेल तर मुळ पालकांनी शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी पालकाच्या स्वाक्षरीनिशी विद्यार्थी ज्या वर्गात शिकत असेल त्या वर्गशिक्षकांना भेटून त्यांच्याकडे अर्ज सादर करावा, अर्ज सादर करतांना विद्यार्थ्याकडे शाळेने दिलेले कोणत्याही प्रकारचे पुस्तके जमा नसावीत व कोणत्याही प्रकारचे शुल्क बाकी नसावे. |
14.2 | पालकांनी वर्गशिक्षकांकडे सादर केलेला अर्ज वर्गशिक्षक शाळा सुटल्यानंतर शाळेच्या कार्यालयात स्टुडंट आय.डी.सह जमा करतील व कार्यालयाकडून सात दिवसांच्या आत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र टि.सी. ) तयार करुन घेऊन मुळ पालकांकडे ठरलेल्या वेळेत हस्तांतरीत करतील. |
Today's
Visitors
Total
Visitors
Last
Updated: