२०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ठरल्याप्रमाणे २०१५ पासुन आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. योग ही एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे ज्याचा उगम भारतात झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी त्याच्या संयुक्त राष्ट्राच्या संबोधनात २१ जून ही तारीख सुचविली आहे, कारण हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे.२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस शाळेत साजरा करण्यात आला.शाळेतील योगशिक्षक श्री चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांचा विविध प्रकारचे प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम तसेच विविध व्यायाम प्रकाराच्या माध्यमातून सराव करून घेतला तसेच विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी गायत्रीमंत्र, संकल्पमंत्र, महामृत्युंजय मंत्र ओंकार जप पठण करण्यात आले. विविध प्रकारच्या हालचाली, प्राणायाम, सूर्यनमस्कार यांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आले.त्यातील काही निवडक क्षणाचे छायाचित्रे
दरवर्षीप्रमाणे शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये लपलेल्या कलागुणांचे प्रदर्शन करणे आणि आत्मविश्वासाने व्यक्त होणे यासाठी एक मैत्रीपूर्ण व्यासपीठ प्रदान करणे हा होता.पालखीसह पायी दिंडी व वृक्षदिंडी हा धार्मिक मिरवणुकीचा उत्सव आहे जो दरवर्षी जून-जुलै महिन्यात साजरा केला जातो.आषाढी एकादशी म्हणजे मराठी दिनदर्शिकेनुसार आषाढ शुक्ल पक्ष . आपण प्रत्येक महिन्यातील अकरावा दिवस हा एकादशी म्हणुन उपवास पाळतो.शाळेत १० जूलै २०२२ रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी वृक्ष दिंडी व ज्ञानेश्वर माऊली च्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान केलेला होता तर काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल व रुक्मिणी तसेच इतर संतांच्या भूमिका साकारून आषाढी एकादशी साजरी केली. तसेच विद्यार्थ्यांनी टाळ आणि मृदुंगाने व फुगडी तसेच पावली खेळून या सनाचा आनंद घेतला. विद्यार्थी व शिक्षकांनी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीला सुंदर फुलांनी सजवून भक्तिगीते व विठ्ठल आरती, अभंग यांचे गायन करुन शालेय परिसरातील वातावरण भक्तीमय केले. विठ्ठल जय हरी विठ्ठल च्या जयघोषाने संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला. या उत्सवाने विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या वारशाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले . शालेय वातावरण आनंदाने आणि अध्यात्माने भरलेले होते.त्यातील काही निवडक क्षणाचे छायाचित्र.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला. दरवर्षीप्रमाणे १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन शाळेत साजरा करण्यात आला तसेच भारताला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांसह देशभरातील विविध सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत देशभक्ती ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी विविध कवायतीचे प्रकार, देशभक्तीपर भाषणे, देशभक्तीपर समुह तसेच भक्ती गीतांच्या माध्यमातून शालेय परिसरात जनजागृती केली. तसेच हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत शालेय परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली व त्यानंतर शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्र
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताह निमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन
थीम:- हस्तकला व रक्षाबंधन
उपक्रम :- स्वातंत्र्य दिन सजावट साहित्य व राखी तयार करणे.
दिनांक -०८ ऑगस्ट २०२२
थीम:- मेहंदी व पुष्परचना
उपक्रम :- मेहंदीचे विविध प्रकार तसेच पुष्परचनेमधील विविधता
दिनांक -१० ऑगस्ट २०२२
्
थीम:- चित्रकला
उपक्रम :- चित्रकलेमधील अक्षर लेखन
दिनांक -११ऑगस्ट २०२२
थीम:- विविधतेतून एकता
उपक्रम :- राज्यानुसार वेशभूषा व संवाद स्पर्धा
दिनांक -१२ ऑगस्ट २०२२
थीम:- विचार सौंदर्य
उपक्रम :- निबंध स्पर्धा
दिनांक -१३ ऑगस्ट २०२२
थीम:- देशभक्ती
उपक्रम :- नृत्य स्पर्धा ( देशभक्तीपर गीते )
दिनांक -१४ ऑगस्ट २०२२
थीम:- देशभक्ती
उपक्रम :- विविध कवायत , भाषणे, समूह व स्वागत गीत
दिनांक -१५ ऑगस्ट २०२२
दहीहंडीत गोकुळाष्टमी या हिंदू धर्मातील सणातील एक उत्सवी कार्यक्रम आणि सांघिक सण मानला जातो. ज्याला कृष्ण जन्माष्टमी असेही म्हणतात. म्हणजेच कृष्णाचा जन्म साजरा केला जातो. दहीहंडी हा उत्सव दरवर्षी ऑगस्ट/सप्टेंबरला महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. त्यात समुदाय दही किंवा दुधावर आधारित इतर स्वादिष्ट पदार्थांनी भरलेले मातीचे भांडे म्हणजेच दहीहंडी उंचीवर बांधुन तरुण पुरुष आणि मुले संघ बनवतात, मानवी पिरॅमिड बनवतात आणि दहीहंडी गाठण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न करतात. भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या दुसऱ्या दिवसी गोपाळकाल हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. शाळेत १९ ऑगस्ट २०२२ रोजी दहीहंडी व गोपाळकाला हा उपक्रम घेण्यात आला.याप्रसंगी शाळेत काही विद्यार्थ्यांनी राधा व कृष्ण यांचा वेश परिधान करत शाळेतील वातावरण हे आनंदमय केले. तसेच प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचा मानवी मनोरा दहीहंडी फोडण्यासाठी तयार करण्यात आला . विद्यार्थ्यांच्या मानवी मनोऱ्याची विविध थर तयार झाल्यानंतर राधा व कृष्ण बनवून आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याप्रसंगीचे काही निवडक क्षणांचे छायाचित्र
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षकी या पेशासाठी समर्पित केल्यानंतर स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती या पदाची शपथ घेतल्यानंतर म्हणजेच १९६२ मध्ये लोकांनी वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली असता माझा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे सांगितले म्हणून १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे. शाळेत शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन हा विद्यार्थ्यांना शालेय दैनंदिन कामकाजाचा अनुभव मिळावा हा मानस ठेवून साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची तर काहींनी सेवकांची भूमिका बजावत संपूर्ण एक दिवस शाळेचे कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्र.
श्रीगणेश चतुर्थी याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण मानला जातो.संपूर्ण भारत आणि जगातील काही प्रांतात तो साजरा केला जातो. १९ व्या शतकात भारतीय स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळक यांनी १८९२ मधील सार्वजनिक विरोधी असेंब्ली कायद्याद्वारे हिंदू मेळाव्यांवरील वसाहतवादी ब्रिटीश सरकारने घातलेल्या बंदीपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचे आवाहन केले.शाळेत इ.५ ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्तीचे पर्यावरण पुरक फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच दरवर्षीप्रमाणे २० ऑगस्ट २०२२ रोजी शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी व उपप्रतिनिधीनी बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली व शाळेतील या उपक्रमात १०० % विद्यार्थ्यांनी प्रतिसाद घेतला. शाळेत विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या गणेश मूर्तीची घरी स्थापना करून घरीच विसर्जन करण्यात आले. काही निवडक क्षणांचे छायाचित्र
मराठवाडात दरवर्षीप्रमाणे १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. जेव्हा भारतीय सैन्याने हैदराबाद राज्यावर आक्रमण केले आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर १३ महिन्यांनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचा पराभव केला.शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त वृक्षारोपण व ध्वजारोहणाच्या उपक्रम आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले तसेच विविध कवायती, स्वागत गीत व समुह गित गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शाळेत व छारोहणास उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेत मोहगनी या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्र.
शाळेची दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक सहल यावर्षी तीन दिवसीय सहल रायगड- प्रतापगड व महाबळेश्वर या ठिकाणी शाळेने काढली. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक गड व किल्ले यांची माहिती देणे तसेच महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देणे. आपल्या संस्कृतीची जपवणूक व ऐतिहासिक वारसा जपणे हा माणूस ठेवून शाळेने सहल भेटीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना परिस्थितीनुसार बाह्य ठिकाणी जुळवून घेणे, परिस्थिती हाताळणे तसेच स्वतःचे कामे स्वतः करणे अशी विविध अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले. या सहली दरम्यान विद्यार्थ्यांना स्वराज्याची राजधानी रायगड वरील विविध ठिकाणांची प्रसंगोपाद माहिती देण्यात आली. तसेच प्रतापगड वरील छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्या भेटीदरम्यान चा प्रसंग विद्यार्थ्यांना नाट्यमय पद्धतीने वर्णन करून सांगण्यात आला. जसे की जावळीचे खोरे, त्यावेळची निरोप देण्याची पद्धती, असे विविध संबोध विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगण्यात आले. तसेच महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन माहिती देण्यात आली.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्र.
शाळेची इ.१ ली ते ४ थी या वर्गांची दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक सहल यावर्षी एक दिवसीय सहल नॅचरोफिल्स ( पळशी) औरंगाबाद या ठिकाणी शाळेने काढली. विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, रेन डान्स ,वॉटर पार्क इतर आवश्यक अनुभव देणे हा माणूस ठेवून शाळेने सहल भेटीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना परिस्थितीनुसार बाह्य ठिकाणी जुळवून घेणे, परिस्थिती हाताळणे तसेच स्वतःचे कामे स्वतः करणे अशी विविध अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले. या सहली दरम्यान विद्यार्थ्यांना वनभोजनाचा अनुभवी देण्यात आला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्र
पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील असलेल्या क्रीडा कौशल्याला वाव देणे . तसेच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये असलेल्या क्रीडा क्षेत्रातील विविध संधींची जाणीव करून देणे तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. सांघिक खेळातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना तसेच राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव करून देणे हा माणस ठेवून शाळेने संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वयानुसार स्पर्धांचे दोन गटात विभाजन करण्यात आले जसे की प्राथमिक व माध्यमिक विभाग त्यात प्रामुख्याने खालील स्पर्धांचा समावेश करण्यात आला.
स्पर्धेचे नाव:-
१] कब्बडी
२] खो-खो
३] बुध्दिबळ
४] क्रिकेट
५] तीन पायांची शर्यत
६] चमचा लिंबू
७] संगीत खुर्ची
८] थैला रेस
स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या काही निवडक क्षणांचे छायाचित्र. .
दरवर्षीप्रमाणे शाळेचे आपली पौराणिक व ऐतिहासिक परंपरा ही थीम असणारे २४ वे वार्षिक स्नेहसंमेलनाचे संत एकनाथ नाट्यमंदिर उस्मानपुरा औरंगाबाद या ठिकाणी करण्यात आली होते. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये शंभर टक्के शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या एकूण व्यासपीठ कौशल्याला चालना मिळावी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळून विकसित व्हावेत हा उद्देश ठेवून शाळेने या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये एकूण ३४ पेक्षा जास्त सादरीकरण यांचा समावेश होता. त्यामध्ये प्रामुख्याने ऐतिहासिक नाटकांचा, पौराणिक गीतांचा व समाजातील अनिष्ट प्रथा थांबविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रबोधनपर नाटकांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व इतर मान्यवरांनी पालकांना विद्यार्थ्याच्या विकासाच्या दृष्टीने विविध विषयावरती मार्गदर्शन केले. त्यातील काही निवडक क्षणांची छायाचित्रे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेत वर्षभरात होणाऱ्या उपक्रम तसेच स्पर्धांच्या बक्षिसाचे वितरण करण्यासाठी शाळेत वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वर्षभरातील स्पर्धांच्या एकूण गुणांची मूल्यांकन करून विद्यार्थ्यांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिकाचे तसेच प्रमाणपत्राचे वितरण उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेतील सर्वात मोठे बक्षीस म्हणजेच आदर्श विद्यार्थी २०२२-२३ हा एकूण तीन विभागात देण्यात आला त्याच प्रामुख्याने प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक विभागाचा समावेश होतो. शाळेने ठरवलेल्या निकषांच्या आधारे या विभागातून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व सन्माननीय पाहुण्यांच्या असते त्या विद्यार्थ्यांना Student Of Year 2022-23 ची ट्रॉफी व Student Of Year 2022-23 चे प्रमाणपत्र Student Of Year चा बॅच देऊन या विद्यार्थ्यांची कौतुक करण्यात आले. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्र.
शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त २८ फेब्रुवारी २०२३ रोजी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये वैयक्तिक तसेच वर्ग निहाय प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये एकूण. ५० पेक्षा जास्त प्रयोग सह साहित्यासह सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगाची माहिती ही विशिष्ट मुद्द्यांच्या सह सादर केली तसेच त्या प्रयोगाचे दैनंदिन जीवनात फायदे तोटे तसेच त्या प्रयोगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांनी स्पष्ट करून पटवून दिले. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे महत्त्व विज्ञान दिन का साजरा करण्यात येतो. विज्ञान सर्वच घडणाऱ्या गोष्टींच्या पाठीमागे कसे असते या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यातील काही निवडक क्षणांची छायाचित्रे.
शाळेत २८ मार्च २०२३ रोजी आनंदनगरी चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनाचाही अनुभव देणे. चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगणे . तसेच जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी मागे गणित आहे ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून किंवा वैयक्तिकरित्या असे एकूण ४२ खाद्यपदार्थ चे तसेच खेळांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉल वरील खाद्यपदार्थाच्या विक्रीतून विद्यार्थ्यांना मिळणारा नफा हा दुपटीपेक्षा जास्त होता. या आनंद नगरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंद अनुभव मिळाला त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
Today's
Visitors
Total
Visitors
Last
Updated: