२०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ठरल्याप्रमाणे २०१५ पासुन आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. योग ही एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे ज्याचा उगम भारतात झाला आहे. २१ जून हा दिवस हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे.२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस शाळेत साजरा करण्यात आला.शाळेतील योगशिक्षक श्री बालाजी चौधरी यांनी विद्यार्थ्यांचा विविध प्रकारचे प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम तसेच विविध व्यायाम प्रकाराच्या माध्यमातून सराव करून घेतला तसेच विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी गायत्रीमंत्र, संकल्पमंत्र, महामृत्युंजय मंत्र ओंकार जप पठण करण्यात आले. विविध प्रकारच्या हालचाली, प्राणायाम, सूर्यनमस्कार यांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नियमित २० सूर्यनमस्कार करावेत . सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम असून २१ व्या शतकातील गतिमान जीवनामुळे शरीराकडे लक्ष देण्याची गरज आहे तसेच व्यायामाचे महत्त्व कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. राजेंद्र पवार सर यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री दिपक औटे यांनी सर्व व्यायाम प्रकाराचे फायदे व त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना नियमित व्यायामाची सवय लागावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे
२६ जून २०२४ रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा मानस ठेवून विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचे असलेले हस्ताक्षर हे सुंदर असावे म्हणून सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . सुंदर हस्ताक्षर हा एक प्रकारचा दागिनाच आहे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच सुंदर हस्ताक्षराची गोडी लागावी. तसेच या स्पर्धेच्या युगात स्पर्धेला न घाबरता स्पर्धेसाठी तयार जाणे तसेच कुठेही मागे न राहता प्रत्येक स्पर्धेत सहभागी होणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
दरवर्षीप्रमाणे शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये लपलेल्या कलागुणांचे प्रदर्शन करणे आणि आत्मविश्वासाने व्यक्त होणे यासाठी एक मैत्रीपूर्ण व्यासपीठ प्रदान करणे हा होता.पालखीसह प्रतिकात्मक स्वरूपातील पायी दिंडी व वृक्षदिंडी हा धार्मिक मिरवणुकीचा उत्सव आहे जो दरवर्षी जून-जुलै महिन्यात साजरा केला जातो.आषाढी एकादशी म्हणजे मराठी दिनदर्शिकेनुसार आषाढ शुक्ल पक्ष ,आपण प्रत्येक महिन्यातील अकरावा दिवस हा एकादशी म्हणुन उपवास पाळतो.शाळेत १० जुन २०२३ रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी प्रतीकात्मक स्वरूपातील वृक्ष दिंडी व ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान केलेला होता तर काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल व रुक्मिणी तसेच इतर संतांच्या भूमिका साकारून आषाढी एकादशी हा सण साजरा केला. तसेच विद्यार्थ्यांनी टाळ आणि मृदुंगाने व फुगडी तसेच पावली खेळून या सनाचा आनंद घेतला. विद्यार्थी व शिक्षकांनी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीला सुंदर फुलांनी सजवून भक्तिगीते व विठ्ठल आरती, अभंग यांचे गायन करुन शालेय परिसरातील वातावरण भक्तीमय केले. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल च्या जयघोषाने संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला. या उत्सवाने विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या वारशाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले . शालेय वातावरण आनंदाने आणि अध्यात्माने भरलेले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे..
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला. दरवर्षीप्रमाणे १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन शाळेत साजरा करण्यात आला तसेच भारताला स्वातंत्र्य मिळुन ७७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाळेत तीन दिवसीय ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांसह देशभरातील विविध सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात.यादिवशी विद्यार्थ्यांनी विविध कवायतीचे प्रकार, देशभक्तीपर भाषणे, देशभक्तीपर समुह तसेच भक्ती गीतांच्या माध्यमातून शालेय परिसरात जनजागृती केली. तसेच हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत शालेय परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली व त्यानंतर शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…
दहीहंडी तसेच गोकुळाष्टमी या हिंदू धर्मातील सणातील एक उत्सवी कार्यक्रम आणि सांघिक सण मानला जातो. ज्याला कृष्ण जन्माष्टमी असेही म्हणतात. म्हणजेच कृष्णाचा जन्म साजरा केला जातो. दहीहंडी हा उत्सव दरवर्षी ऑगस्ट/सप्टेंबरला महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. त्यात समुदायीक दही किंवा दुधावर आधारित इतर स्वादिष्ट पदार्थांनी भरलेले मातीचे भांडे म्हणजेच दहीहंडी उंचीवर बांधुन तरुण पुरुष आणि मुले संघ बनवतात, मानवी पिरॅमिड बनवतात आणि दहीहंडी गाठण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न करतात. भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या दुसऱ्या दिवसी गोपाळकाला हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. शाळेत ७ सप्टेंबर २०२४ रोजी दहीहंडी व गोपाळकाला हा उपक्रम घेण्यात आला.याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी राधा व कृष्ण यांचा वेश परिधान करत शाळेतील वातावरण हे आनंदमय केले. तसेच प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचा मानवी मनोरा दहीहंडी फोडण्यासाठी तयार करण्यात आला . याचे विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थिनी सुध्दा मोठ्या प्रमाणावर उत्साहाने सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या मानवी मनोऱ्याची विविध तसेच उंच थर तयार झाल्यानंतर राधा व कृष्ण बनवून आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. विद्यार्थ्यांना भारतीय सणांची माहिती देणे या मानस ठेवून या उपक्रमाच्या आयोजन शाळेने केले होते. याप्रसंगीचे काही निवडक क्षणांचे छायाचित्रे…
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षकी या पेशासाठी समर्पित केल्यानंतर स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती या पदाची शपथ घेतल्यानंतर म्हणजेच १९६२ मध्ये लोकांनी वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली असता माझा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे सांगितले म्हणून १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे. शाळेत ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन हा विद्यार्थ्यांना शालेय दैनंदिन कामकाजाचा अनुभव मिळावा हा माणस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची तर काहींनी सेवकांची भूमिका बजावत संपूर्ण एक दिवस शाळेचे कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना समाजातील विविध भूमिकांची जाण करून देणे शाळेचे व्यवस्थापन कशाप्रकारे कार्य करते याची माहिती देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. तसेच त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे….
श्रीगणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण मानला जातो.संपूर्ण भारत आणि जगातील काही प्रांतात तो साजरा केला जातो. १९ व्या शतकात भारतीय स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळक यांनी १८९२ मधील सार्वजनिक विरोधी असेंब्ली कायद्याद्वारे हिंदू मेळाव्यांवरील वसाहतवादी ब्रिटीश सरकारने घातलेल्या बंदीपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचे आवाहन केले होते. दरवर्षीप्रमाणे शाळेत इ.५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्तीचे पर्यावरण पुरक फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच दरवर्षीप्रमाणे १९सप्टेंबर २०२४ रोजी शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी व उपप्रतिनिधीनी बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली . हे उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमात शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेत विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या गणेश मूर्तीची विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी स्थापना करून घरीच विसर्जन केले . त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…
मराठवाडात दरवर्षीप्रमाणे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. जेव्हा भारतीय सैन्याने हैदराबाद राज्यावर आक्रमण केले आणि भारतीय स्वातंत्र्याच्या १३ महिन्यांनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचा पराभव करून मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला.शाळेत १७ सप्टेंबर २०२४ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाची गरज व तात्कालीन प्ररिस्थिती यावर आपल्या भाषणाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले तसेच विविध कवायती, स्वागत गीत व समुह गीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शाळेत याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकार सहसाहित्य सादर केले.त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…
शाळेची दरवर्षीप्रमाणे प्राथमिक विभागाची शैक्षणिक सहल यावर्षी १२ डिसेंबर २०२४ रोजी एकदिवसीय सहलीचे खटोड फार्म कारकिन ता- पैठण छत्रपती संभाजीनगर याठिकाणी नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना त्याठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात समाजातील विविध व्यवसायांची माहिती देण्यात आली . विद्यार्थ्यांनी खटोड फार्म कारकिन ता- पैठण जिल्हा -छत्रपती संभाजीनगर यापार्क मध्ये उपलब्ध असलेल्या विविध साहित्याचा उपयोग करून मनसोक्त आनंद घेतला.विद्यार्थ्यांना परिस्थितीनुसार बाह्य ठिकाणी जुळवून घेणे, परिस्थिती हाताळणे तसेच स्वतःचे कामे स्वतः करणे अशी विविध अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा मानस ठेवून शाळेने याउपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…
शाळेची दरवर्षीप्रमाणे माध्यमिक विभागाची शैक्षणिक सहल यावर्षी १७ ते २० डिसेंबर २०२४ रोजी चार दिवसीय सहल छत्रपती संभाजीनगर ते कोल्हापूर दर्शन तसेच लक्ष्मी वॉटरपार्क या ठिकाणी शाळेने काढली. विद्यार्थ्यांना धार्मिक स्थळांची माहिती देणे तसेच महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देणे. आपल्या संस्कृतीची जपवणूक व धार्मिक तसेच ऐतिहासिक वारसा जपणे हा माणस ठेवून शाळेने सहल भेटीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना परिस्थितीनुसार बाह्य ठिकाणी जुळवून घेणे, परिस्थिती हाताळणे तसेच स्वतःचे कामे स्वतः करणे अशी विविध अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले. या सहली दरम्यान विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती यांच्या जीवनातील महत्त्वाचा वाटणारा पन्हाळा या गडाला भेट देऊन गडाविषयी विविध ठिकाणांची माहिती देण्यात आली तसेच कोल्हापूर च्या संदर्भातील विविध ठिकाणांची प्रसंगोपाद माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना श्रीरामपूर जवळील असलेल्या लक्ष्मी वॉटर पार्क याठिकाणी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे कृती करुन घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना मनसोक्त आनंद मिळावा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…
Today's
Visitors
Total
Visitors
Last
Updated: