“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr.

Creative Corner 2025-26

राष्ट्रीय योग दिन 2025

विविध प्रात्यक्षिके

2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ठरल्याप्रमाणे 2015 पासुन आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. योग ही एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे ज्याचा उगम भारतात झाला आहे. 21 जून हा दिवस हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे.21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस शाळेत साजरा करण्यात आला.शाळेतील योगशिक्षक श्री बालाजी चौधरी यांनी विद्यार्थ्यांचा विविध प्रकारचे प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम तसेच विविध व्यायाम प्रकाराच्या माध्यमातून सराव करून घेतला तसेच “Exercise not only changes your body, it changes your mind, your attitude and your mood.” यावाक्याप्रमाणे विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी गायत्रीमंत्र, संकल्पमंत्र, महामृत्युंजय मंत्र ओंकार जप पठण करण्यात आले. विविध प्रकारच्या हालचाली, प्राणायाम, सूर्यनमस्कार यांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नियमित 20 सूर्यनमस्कार करावेत . सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम असून 21 व्या शतकातील गतिमान जीवनामुळे शरीराकडे लक्ष देण्याची गरज आहे तसेच व्यायामाचे महत्त्व कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. राजेंद्र पवार सर यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री दिपक औटे यांनी सर्व व्यायाम प्रकाराचे फायदे व त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. तसेच शाळेत छंदवर्ग [Student Activity Club ] याविभागाच्या माध्यमातुन विविध खेळासाठी आठवडयातील दर बुधवारी व शनिवारी विद्यार्थी मनसोक्त खेळाचा आनंद घेतात. दप्तर मुक्त शाळा हा उपक्रमही शाळेत घेण्यात येतो. विद्यार्थ्यांना नियमित व्यायामाची सवय लागावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे

राजश्री शाहू महाराज यांची जयंती 2025

सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

26 जून 2025 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा मानस ठेवून शालेय जिवनात महत्त्वाचे असलेले हस्ताक्षर हे सुंदर असावे म्हणून सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . सुंदर हस्ताक्षर हा एक प्रकारचा दागिनाच आहे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच सुंदर हस्ताक्षराची गोडी लागावी. तसेच या स्पर्धेच्या युगात स्पर्धेला न घाबरता स्पर्धेसाठी तयार राहणे तसेच  कुठेही मागे न राहता प्रत्येक  स्पर्धेत सहभागी होणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.

आषाढी एकादशी 2025

वारकरी वेशभूषा स्पर्धा व वृक्ष दिंडीचे आयोजन

दरवर्षीप्रमाणे शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये लपलेल्या कलागुणांचे प्रदर्शन करणे आणि आत्मविश्वासाने व्यक्त होणे यासाठी एक मैत्रीपूर्ण व्यासपीठ प्रदान करणे हा होता.पालखीसह प्रतिकात्मक स्वरूपातील पायी दिंडी व वृक्षदिंडी हा धार्मिक मिरवणुकीचा उत्सव आहे जो दरवर्षी जून-जुलै महिन्यात साजरा केला जातो.आषाढी एकादशी म्हणजे मराठी दिनदर्शिकेनुसार आषाढ शुक्ल पक्ष ,आपण प्रत्येक महिन्यातील अकरावा दिवस हा एकादशी म्हणुन उपवास पाळतो.शाळेत 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी प्रतीकात्मक स्वरूपातील वृक्ष दिंडी व ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान केलेला होता तर काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल व रुक्मिणी तसेच इतर संतांच्या भूमिका साकारून आषाढी एकादशी हा सण साजरा केला. “Nature is the art of God.” याउक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी टाळ आणि मृदुंगाने व फुगडी तसेच पावली खेळून या सनाचा आनंद घेतला. विद्यार्थी व शिक्षकांनी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीला सुंदर फुलांनी सजवून भक्तिगीते व विठ्ठल आरती, अभंग यांचे गायन करुन शालेय परिसरातील वातावरण भक्तीमय केले. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल च्या जयघोषाने संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला. या उत्सवाने विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या वारशाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले .तसेच विद्यार्थ्यांना संस्कारक्षम तसेच आध्यात्मिक संस्काराचा अनुभव देणे, शालेय वातावरण आनंदमय करणे. हा मानस ठेवुन शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे..

भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन

भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन व स्वातंत्राचा अमृत महोत्सवाची सांगतेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला. दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट 2025 रोजी भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन शाळेत साजरा करण्यात आला तसेच भारताला स्वातंत्र्य मिळुन 79 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाळेत तीन दिवसीय ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांसह देशभरातील विविध सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात.यादिवशी विद्यार्थ्यांनी विविध कवायतीचे प्रकार विविध संगीत वाद्याच्या साहयाने सादर केले तसेच देशभक्तीपर भाषणे, देशभक्तीपर समुह तसेच भक्ती गीतांच्या माध्यमातून शालेय परिसरात जनजागृती केली. तसेच हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत शालेय परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली व त्यानंतर शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. A true patriot is a person who deeply believes in the unity and integrity of india याप्रमाणे याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वातंत्र्य दिनाबददलचे विचार भाषणरुपी मराठी ,हिंदी,इग्रंजी या भाषेतून मांडले. तर काही विद्यार्थ्यानी देशभक्तांच्या वेशभुषा धारण करुन शालेय परिसरात जनजागृती केली.त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.

गोपाळकाला

दहीहंडी उत्सव

दहीहंडी तसेच गोकुळाष्टमी या हिंदू धर्मातील सणातील एक उत्सवी कार्यक्रम आणि सांघिक सण मानला जातो. ज्याला कृष्ण जन्माष्टमी असेही म्हणतात म्हणजेच कृष्णाचा जन्म साजरा केला जातो. दहीहंडी हा उत्सव दरवर्षी ऑगस्ट/सप्टेंबरला महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. त्यात समुदाय दही किंवा दुधावर आधारित इतर स्वादिष्ट पदार्थांनी भरलेले मातीचे भांडे म्हणजेच दहीहंडी उंचीवर बांधुन तरुण पुरुष आणि मुले संघ बनवतात, मानवी पिरॅमिड बनवतात आणि दहीहंडी गाठण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न करतात. भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या दुसऱ्या दिवसी गोपाळकाला हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. शाळेत “विसरुनी सारे मतभेद लोभ – अहंकार सोडा रे सर्वधर्मसमभाव जागवून आपुलकीची दहीहंडी फोडा रे, या उक्तीप्रमाणे 16 ऑगस्ट 2025 रोजी दहीहंडी व गोपाळकाला हा उपक्रम घेण्यात आला.याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी राधा व कृष्ण यांचा वेश परिधान करत शाळेतील वातावरण हे आनंदमय केले. तसेच प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचा मानवी मनोरा दहीहंडी फोडण्यासाठी तयार करण्यात आला ‌. यांचे विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थिनी सुध्दा मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या मानवी मनोऱ्याची विविध थर तयार झाल्यानंतर राधा व कृष्ण बनवून आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याप्रसंगीचे काही निवडक क्षणांचे छायाचित्रे…

श्री गणेश चतुर्थी 2025

पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना व विसर्जन

श्रीगणेश चतुर्थी याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण मानला जातो.संपूर्ण भारत आणि जगातील काही प्रांतात तो साजरा केला जातो. 19 व्या शतकात भारतीय स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळक यांनी 1892 मधील सार्वजनिक विरोधी असेंब्ली कायद्याद्वारे हिंदू मेळाव्यांवरील वसाहतवादी ब्रिटीश सरकारने घातलेल्या बंदीपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचे आवाहन केले.शाळेत All true Happiness, Pure joy, sweet bounties and untroubled pleasure lies in the knowledge of God and love of God; they cannot exist without them.याप्रमाणे इ.05 ते 09 वी च्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्तीचे पर्यावरण पुरक फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच दरवर्षीप्रमाणे 27 ऑगस्ट 2025 रोजी शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी व उपप्रतिनिधीनी बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली व शाळेतील या उपक्रमात 100 % विद्यार्थ्यांनी प्रतिसाद घेतला. शाळेत विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या गणेश मूर्तीची घरी स्थापना करून घरीच विसर्जन करण्यात आले. काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…

शिक्षक दिन

शाळेत शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिनाचे आयोजन

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षकी या पेशासाठी समर्पित केल्यानंतर स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती या पदाची शपथ घेतल्यानंतर म्हणजेच 1962 मध्ये लोकांनी वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली असता माझा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे सांगितले म्हणून 1962पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे. शाळेत 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन हा विद्यार्थ्यांना शालेय दैनंदिन कामकाजाचा अनुभव मिळावा हा माणस साजरा करण्यात आला. Every Teacher Is Columbus Of His Method Or Subject यासंकल्पनेप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा मानस ठेवुन शाळेतील काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची तर काहींनी सेवकांची भूमिका बजावत संपूर्ण एक दिवस शाळेचे कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला.उत्कृष्ट अध्यापन करणा-या करणा-या विद्यार्थी शिक्षकांना शाळेच्या वतीने भेटवस्तु देण्यात आली तसेच शाळेतील कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना भेटवस्तू देउन त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना समाजातील विविध भूमिकांची जाण करून देणे शाळेचे व्यवस्थापन कशाप्रकारे कार्य करते याची माहिती देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. तसेच त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 2025

शाळेत ध्वजारोहणाचे तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन

मराठवाडात दरवर्षीप्रमाणे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. जेव्हा भारतीय सैन्याने हैदराबाद राज्यावर आक्रमण केले आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 13 महिन्यांनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाचा पराभव करून मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला.शाळेत 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाची गरज व तात्कालीन प्ररिस्थिती यावर आपल्या भाषणाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले तसेच विविध कवायती, स्वागत गीत व समुह गीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शाळेत याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकार सहसाहित्य सादर केले.त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…

शैक्षणिक सहल 2025-26

खटोड फार्म कारकिन ता.पैठण छत्रपती संभाजीनगर (माध्यमिक विभाग )

शाळेची “The world is a book and those who do not travel read only one page” या उक्तीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे प्राथमिक विभागाची शैक्षणिक सहल यावर्षी 25 नोव्हेंबर 2025 रोजी एकदिवसीय सहलीचे खटोड फार्म कारकिन ता- पैठण छत्रपती संभाजीनगर याठिकाणी नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना त्याठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात समाजातील विविध व्यवसायांची माहिती देण्यात आली .विद्यार्थ्यांनी खटोड फार्म कारकिन ता- पैठण जिल्हा -छत्रपती संभाजीनगर यापार्क मध्ये उपलब्ध असलेल्या विविध साहित्याचा उपयोग करून मनसोक्त आनंद घेतला. “Life is a trip, travelling is living twice” हा मानस ठेवुन विद्यार्थ्यांना परिस्थितीनुसार बाह्य ठिकाणी जुळवून घेणे, परिस्थिती हाताळणे तसेच स्वतःचे कामे स्वतः करणे अशी विविध अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा मानस ठेवून शाळेने याउपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…

खटोड फार्म कारकिन ता.पैठण छत्रपती संभाजीनगर ( प्राथमिक विभाग )

शाळेची Travel not to find yourself, but to remember who you’ve been all along. याउक्तीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे प्राथमिक विभागाची शैक्षणिक सहल यावर्षी 27 नोव्हेंबर 2025 रोजी एकदिवसीय सहलीचे खटोड फार्म कारकिन ता- पैठण छत्रपती संभाजीनगर याठिकाणी नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना त्याठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात समाजातील विविध व्यवसायांची माहिती देण्यात आली .विद्यार्थ्यांनी खटोड फार्म कारकिन ता- पैठण जिल्हा -छत्रपती संभाजीनगर यापार्क मध्ये उपलब्ध असलेल्या विविध साहित्याचा उपयोग करून मनसोक्त आनंद घेतला.विद्यार्थ्यांना परिस्थितीनुसार बाह्य ठिकाणी जुळवून घेणे, परिस्थिती हाताळणे तसेच स्वतःचे कामे स्वतः करणे अशी विविध अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच TRAVEL IS NOT REALLY ABOUT LEAVING OUR HOMES BUT LEAVING OUR HABITS हा मानस ठेवून शाळेने याउपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…

शाळेचे 27 वे वार्षिक स्नेहसंमेलन 2025-26

शाळेच्या आपली कर्तव्ये ही थीम असणारे 27 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन...

“ Knowing Others Is Intelligence ,Knowing Yourself Is True Wisdom,Mastering Others Is Strength,Mastering Yourself Is True Power ” याउक्तीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे शाळेचे “आपली कर्तव्ये “ ही थीम असणारे 27 वे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 01 ते 02 जानेवारी 2026 रोजी तापडिया नाट्यमंदिर निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तीन सत्रात आयोजित करण्यात आले होते. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या एकूण व्यासपीठ कौशल्याला चालना मिळावी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळून विकसित व्हावेत तसेच ALWAYS TEY TO REPRESENT YOURSEL AS HAPPY INITIALLY-IT BECOME YOUR LOOK ,GRADUALLY- IT BECOME YOUR HABIT AND FINALLY- IT BECOMES YOUR PERSONALITY हा उद्देश ठेवून शाळेने या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये एकूण 49 पेक्षा जास्त सादरीकरणांचा समावेश होता. त्यामध्ये प्रामुख्याने आपली कर्तव्ये या विषयाशी निगडित नाटकांचा, कौटुंबिक गीतांचा व समाजातील अनिष्ट प्रथा थांबविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रबोधनपर नाटकांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व इतर मान्यवरांनी पालकांना विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विषयावरती मार्गदर्शन केले. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेत क्रीडा महोत्सवाचे आयोजन...

सांघिक व वैयक्तिक खेळ

शाळेत Victory Is In The Quality Of Competition And Not The Final Score या उक्तीप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेत 04 ते 11 फेब्रुवारी या दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील असलेल्या क्रीडा कौशल्याला वाव देणे . तसेच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये असलेल्या क्रीडा क्षेत्रातील विविध संधींची जाणीव करून देणे तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. सांघिक खेळातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना तसेच राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव करून देणे हा माणस ठेवून शाळेने संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वयानुसार स्पर्धांचे दोन गटात विभाजन करण्यात आले जसे की प्राथमिक व माध्यमिक विभाग त्यात प्रामुख्याने खालील स्पर्धांचा समावेश करण्यात आला‌.
स्पर्धेचे नाव:-
१] कब्बडी
२] खो-खो
३] बुध्दिबळ
४] क्रिकेट
५] तीन पायांची शर्यत
६] चमचा लिंबू
७] संगीत खुर्ची
स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे…

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 2025-26

वार्षिक बक्षीस वितरण सोहळा 2025-26

शाळेत The Best Preparation For Tomorrow Is Doing Your Best Today या वाक्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेत वर्षभरात होणारे उपक्रम तसेच स्पर्धांच्या बक्षिसाचे वितरण करण्यासाठी शाळेत 19 फेब्रुवारी 2026 रोजी वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वर्षभरातील स्पर्धांच्या एकूण गुणांची मूल्यांकन करून विद्यार्थ्यांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिकांचे तसेच प्रमाणपत्रांचे वितरण उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेतील 97 विद्यार्थ्यांचे शाळेत 100 % उपस्थित राहिल्याबददल 100 % उपस्थितीचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.शाळेतील सर्वात मोठे बक्षीस म्हणजेच आदर्श विद्यार्थी 2025-26 हा एकूण तीन विभागातुन एक देण्यात आला त्यात प्रामुख्याने पुर्व प्राथमिक ,उच्च प्राथमिक व माध्यमिक विभागाचा समावेश होतो. शाळेने ठरवलेल्या निकषांच्या आधारे या तीन विभागातून एका विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांस STUDENT OF THE YEAR 2025-26 ची ट्रॉफी व STUDENT OF THE YEAR 2025-26 चे प्रमाणपत्र STUDENT OF THE YEAR 2025-26 चा बॅच देऊन त्याविद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे

राष्ट्रीय विज्ञान दिन 2025-26

आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन...

शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘’The Science Of Today Is The Technology Of Tomorrow’’ या वाक्याप्रमाणे 28 फेब्रुवारी 2026 रोजी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये वैयक्तिक तसेच वर्ग निहाय प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक वर्गाचा एक या प्रमाणे 17 व वैयक्तिक 44 आसे एकूण 61 प्रयोग सह साहित्यसह सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगाची माहिती ही विशिष्ट मुद्द्यांच्या सह सादर केली तसेच त्या प्रयोगाचे दैनंदिन जीवनात फायदे व तोटे तसेच त्या प्रयोगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांनी स्पष्ट करून पटवून दिले. त्याप्रसंगी शाळेतील विज्ञान शिक्षक श्री.संदिप जाईबहार सर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे महत्त्व तसेच विज्ञान दिन का साजरा करण्यात येतो. या सर्व प्रश्नांचे उत्तर विज्ञान आहे ही संकल्पना विद्यार्थ्यांना विविध घडणाऱ्या गोष्टींच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या माध्यमातुन समजावुन सांगीतली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक मा.श्री.राजेंद्र पवार सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जिवनातील विज्ञानाचे महत्व याबददल मार्गदर्शन केले. त्यातील काही निवडक क्षणांची क्षणचित्रे…

आनंद नगरी 2025-26

विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच विविध खेळांचे स्टॉल व विक्री

शाळेत 11 मार्च 2026 रोजी आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना All Power Is Within You You Can Do Anything And Everything या वाक्याप्रमाणे शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनाचाही अनुभव देणे. चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगणे .तसेच जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी मागे गणित आहे ही संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातुन समजावून सांगणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून किंवा वैयक्तिकरित्या असे एकूण 51 खाद्यपदार्थांचे तसेच खेळांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉल वरील खाद्यपदार्थाच्या विक्रीतून विद्यार्थ्यांना मिळणारा नफा हा दुपटीपेक्षा जास्त होता. या आनंद नगरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंद अनुभव मिळाला.तसेच Believing In Yourself Is The First Secret Of Success हा मानस ठेवुन शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by