पर्यावरणपूरक श्रींच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांनी त्याच्या कलाशिक्षक मार्गदर्शनाखाली शाळेतच श्रींची मूर्ती तयार करून अंतीम रंग सुध्दा दिला तो प्रसंग…
Educationl Trip
शाळेच्या एकूण नियोजनात दैनंदिन अभ्यासाबरोबर क्षेत्र भेटींचे ( शैक्षणिक सहलींचे ) आयोजनही शाळा विभागनिहाय करते त्यातीलच पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिर येथील एक क्षण, छायाचित्रात इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यांसोबत वर्गशिक्षिका श्रीमती वर्षा जाईबहार व 4 थी च्या वर्गशिक्षिका श्रीमती सोनम घुले दिसत आहेत.
इयत्ता 10 वी सन 20 – 21 मूल्यमापन कार्यपध्दती जाहीर करण्याबाबत.
इयत्ता 10 वी ( शालांत प्रमाणपत्र परीक्षा सन 20-21 ) चे मुल्यमापन करुन निकाल अंतिम करण्याबाबतचा शासन निर्णय सोबत जोडलेला आहे, सदरील शासन निर्णयानूसार अंतिम निकाल तयार करण्यात येईल.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत शाळेत हस्तकला व रक्षाबंधन ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन सजावट साहित्य स्पर्धेअंतर्गत साहित्य तयार केले. तसेच रक्षाबंधनासाठी राखी तयार करणे स्पर्धेअंतर्गत शाळेत साजरा होणाऱ्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
उपक्रम :- मेहंदीचे विविध प्रकार तसेच पुष्परचनेमधील विविधता
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत शाळेत मेहंदी व पुष्परचना ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी मेहंदी काढण्याच्या विविध प्रकार या स्पर्धेअंतर्गत विविध प्रकारच्या मेहंदीचे प्रदर्शन केले. तसेच पुष्परचनेमधील विविधता या स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पुष्परचनेचे सादरीकरण केले.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
उपक्रम :- चित्रकलेमधील अक्षर लेखन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत शाळेत चित्रकला ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी अक्षर लेखनातील विविध प्रकार या स्पर्धेअंतर्गत विविध प्रकारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या शब्दाचे अक्षरलेखनाचे प्रदर्शन केले.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
उपक्रम :- राज्यानुसार वेशभूषा व संवाद स्पर्धा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत शाळेत विविधतेतून एकता ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी राज्यानुसार वेशभूषा व संवाद या स्पर्धेअंतर्गत राज्यानुसार विविध वेशभूषा साकारून संवादाचे प्रदर्शन केले.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
उपक्रम :- निबंध स्पर्धा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत शाळेत विचार सौंदर्य ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी निबंध या स्पर्धे अंतर्गत निबंधाच्या माध्यमातून विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले. तसेच शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
रावसाहेब पाटील दांडगे यांची पुण्यतिथी
शाळेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील दांडगे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
उपक्रम :- नृत्य स्पर्धा ( देशभक्तीपर गीते )
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत शाळेत देशभक्ती ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी नृत्य स्पर्धे अंतर्गत विविध देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून विविध नृत्यप्रकाराचे कलाविष्कार सादर केले. तसेच हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली व त्यानंतर शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताह निमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन तसेच भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण 
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत शाळेत देशभक्ती ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी विविध कवायतीचे प्रकार, देशभक्तीपर भाषणे, देशभक्तीपर समुह तसेच भक्ती गीतांच्या माध्यमातून शालेय परिसरात जनजागृती केली. तसेच हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली व त्यानंतर शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
मा.श्री.हरिभाऊजी बागडे ( नाना ) यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत खाऊ वाटप
मा.श्री. हरिभाऊजी बागडे ( नाना ) यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत खाऊ वाटप करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. तदनंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
दहीहंडी व गोपाळकाला
शाळेत दहीहंडी व गोपाळकाला निमित्त दहीहंडी फोडणे हा उपक्रम घेण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे तयार करून विविध प्रात्यक्षिकाचे प्रदर्शन केले त्यानंतर राधा व कृष्णा यांच्या वेशात आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा
शाळेत गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या माती पासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. याप्रसंगी शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती रंगविण्याची कार्यशाळा
शाळेत गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती रंगविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. याप्रसंगी शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शालेय संसद निवडणूक व शालेय मंत्रिमंडळाची स्थापना
शाळेत शालेय संसद निवडणूक ही प्रत्यक्ष मतदान पद्धतीने घेण्यात आली.निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांमधून संसदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर सदस्या मधून शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना याप्रसंगी लोकशाहीचे महत्त्व तसेच लोकशाही मधील लोकप्रतिनिधीचे कार्य याची माहिती देण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
दिनांक -३०.०८.२०२२शाळेत शालेय संसद निवडणूक ही प्रत्यक्ष मतदान पद्धतीने घेण्यात आली.निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांमधून संसदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर सदस्या मधून शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना याप्रसंगी लोकशाहीचे महत्त्व तसेच लोकशाही मधील लोकप्रतिनिधीचे कार्य याची माहिती देण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना
शाळेत गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. याप्रसंगी शाळेतील संसदेचे सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधीं यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीची स्थापना व आरती केली. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शाळेत शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिनाचे आयोजन
शाळेत भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षकांची सर्व कामे केली. विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली तसेच शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शाळेत ध्वजारोहण तसेच वृक्षरोपणाचे आयोजन
शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मोहगणी या वृक्षाचे वृक्षरोपण करण्यात आले.तसेच शाळेतील विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी, गरज व तात्कालीन परिस्थिती याविषयी आपले विचार भाषणाच्या माध्यमातून मांडले.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
पं.जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे या स्पर्धेचे आयोजन
शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्यामधील असलेल्या विविध कौशल्यांना प्रेरणा मिळावी तसेच सृजनशीलतेला वाव मिळावा हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत इ.९ वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले संस्काराचे मोती या हस्तलिखिताच्या मुखपृष्ठाबाबत
शाळेत इ.९ वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले संस्काराचे मोती हे नाव असलेल्या हस्तलिखिताचे मुखपृष्ठ चे डिझाईन करताना त्यावर इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो ठरविण्यात आला. हस्तलिखितामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी संग्रह केलेल्या कविता,लेख ,चित्र ,सामान्य ज्ञान इ.समावेश आहे विद्यार्थ्यांना लिखाणाची आवड लागावी ,नवनिर्मितीला चालना देणे व भविष्यात जुने वर्गमित्र,त्यांची आठवण,त्यांचे हस्ताक्षर याची आठवण म्हणून हे हस्तलिखित छापील स्वरूपातील प्रति जेणे करून भविष्यात जसेच्या तसे राहील याप्रमाणे तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्यामधील असलेल्या विविध कौशल्यांना प्रेरणा मिळावी तसेच सृजनशीलतेला वाव मिळावा हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.तसेच या हस्तलिखिताचे विमोचन २४ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यातील मुखपृष्ठ छायाचित्र.
रायगड -प्रतापगड- महाबळेश्वर याठिकाणी तीन दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन
शाळेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी रायगड – प्रतापगड – महाबळेश्वर या ठिकाणी तीन दिवसीय सहलीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचा अनुभव देणे, आपल्या ऐतिहासिक वारशाचे जतन, परिस्थितीशी जुळवून घेणे, भौगोलिक परिस्थितीची सखोल माहिती देणे इ. गोष्टींचा विचार करून सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीमध्ये विद्यार्थ्यांना रायगडावरील शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रसंगांची माहिती देण्यात आली तसेच प्रतापगडावर घडलेल्या प्रसंगांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच महाबळेश्वर मधील विविध रम्य दृश्य विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
नॅचरोफिल्स ( पळशी )औरंगाबाद या ठिकाणी एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन
शाळेने दरवर्षीप्रमाणे नॅचरोफिल्स ( पळशी )औरंगाबाद या ठिकाणी एक दिवसीय सहलीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचा अनुभव देणे, परिस्थितीशी जुळवून घेणे, भौगोलिक परिस्थितीची सखोल माहिती देणे इ. गोष्टींचा विचार करून सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीमध्ये विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, रेन डान्स, वनभोजन, विविध अनुभव याप्रसंगी देण्यात आले. त्यातील एका क्षणांचे छायाचित्र.
पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रिडा महोत्सवाचे आयोजन
पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील असलेल्या क्रीडा कौशल्याला वाव देणे . तसेच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये असलेल्या क्रीडा क्षेत्रातील विविध संधींची जाणीव करून देणे तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. सांघिक खेळातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना तसेच राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव करून देणे हा माणस ठेवून शाळेने संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाच्या आयोजन
शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नाने स्त्री शिक्षणाचे महत्त्व, आजच्या काळातील स्त्रियांची स्थिती, तात्कालीन परिस्थिती, शिक्षण काळाची गरज या सर्व विषयावर आपल्या मनोगत पर भाषणातून प्रकाश टाकला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन
शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशात येऊन त्यांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यासमोर उभे केले. विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती देणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम केला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेच्या आपली पौराणिक व ऐतिहासिक परंपरा ही थीम असणाऱ्या २४ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन
शाळेच्या आपली पौराणिक व ऐतिहासिक ही थीम असणाऱ्या २४ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा औरंगाबाद या नाट्यगृहात करण्यात आले होते. यामध्ये एकूण ३४ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपली पौराणिक व ऐतिहासिक परंपरा ही थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा, संगीत नाटिका तसेच ऐतिहासिक संदेश पर नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इत्यादी गोष्टींचा विचार करून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शाळेत भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण ध्वजारोहणाचे आयोजन.
शाळेत शाळेत भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत व स्वागत गीत सादर केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी संविधानाची आवश्यकता, संविधान निर्मितीची प्रक्रिया, सध्या भारतातील स्थिती, भारत एक महासत्ता अशा विविध विषयावरती मनोगत पर भाषणातून प्रकाश टाकला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कवायतीचे प्रकार विविध संगीत वाद्याच्या साह्याने सादर केले विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता ,एकजुटीची भावना, देशप्रेम ,स्वावलंबन इत्यादी गुणांना प्रेरणा मिळावी यासाठी शाळेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमातील विविध देशभक्तीपर उपक्रमा मुळे शालेय वातावरण देशभक्तीमय झाले. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
क्रांतिसिंह राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे आयोजन
शाळेत क्रांतिसिंह राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांना क्रांतिसिंह राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या विषयी माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना या महान राष्ट्रसंताची माहिती देऊन त्यांच्या कार्याची जाणीव करून देणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन
शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्षभरामध्ये आयोजित विविध स्पर्धा तसेच उपक्रमांच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या कार्याची महती सांगणारे मनोगत पर भाषणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारा पोवाडा तसेच काही विद्यार्थ्यांनी नृत्य देखील सादर केली. शाळेतील तीन विभागात स्टुडन्ट ऑफ द इयर २०२२-२३ या शाळेतील मुख्य पुरस्कारही वितरित करण्यात आला. स्टुडन्ट ऑफ द इयर २०२२-२३ हा प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक या तीन विभागात देण्यात आला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
इ.१० वी च्या निरोप समारंभाचे आयोजन
शाळेत शाळेच्या इ.१० वी च्या आठव्या बॅचच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . त्याप्रसंगी इ.१० दहावीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना तसेच शाळेने त्यांच्याविषयी जोपासलेल्या सर्व संस्कारांना मनोगताच्या माध्यमातून उजाळा दिला . तसेच त्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवसापासून उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता त्या उपक्रमांची चित्रफित त्यांना दाखविण्यात आली व शाळेने कशाप्रकारे त्यांच्या आठवणी तसेच बालपण जपून ठेवले आहेत. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग स्वतः तयार करून त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच कार्य समजावून सांगितले एकूण प्रत्येक गोष्टी मागं विज्ञान असते ही भावना तसेच प्रत्येक गोष्टी विज्ञान जबाबदार असते हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत आनंद नगरीचे आयोजन
शाळेत विद्यार्थ्यांना व्यापारी जीवनाचा व्यवहारिक जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून आनंदनगरी चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून विविध खाद्यपदार्थाचे तसेच विविध खेळाचे एकूण ४२ स्टॉल लावले होती . विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये कसे वागावे ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणे तसेच एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींचा अनुभव देणे हा मानस देऊन शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेच्या आठव्या बॅचच्या निकालाबाबत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2023 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शाळेच्या आठव्या बॅचचाही मागील सर्व बॅचप्रमाणे 100 % निकाल. इयत्ता 10 वी चे सर्वच विद्यार्थी हे 65 टक्केपेक्षा जास्त टक्केवारीने उत्तीर्ण, 75 टक्केपेक्षा जास्त 41 विद्यार्थी व 90 टक्केपेक्षा जास्त गुण संपादन करुन 12 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत,सोबत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल यादी
शाळेत शाळेचा पहिला दिवस तसेच बालब्रम्हाच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन
शाळेत शाळेचा पहिला दिवस तसेच बालब्रम्हाच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत म्हणजेच बालब्रह्माचे स्वागतही करण्यात आले. याप्रसंगी शाळेत वर्षभर घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेत योग शिबिराचे आयोजन
शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेत विविध योगासने तसेच प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना त्याचे फायदे समजावून सांगण्यात आले. तसेच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा विविध योगासने तसेच प्राणायामंचा सराव घेण्यात आला. २१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व तसेच योगाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन.
शाळेत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी वेशभूषा स्पर्धा तसेच वृक्ष दिंडीचे आयोजन
शाळेत आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी तसेच वारकरी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकऱ्याची वेशभूषा धारण केलेली होती. शालेय परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी व वृक्षदिंडी काढण्यात आली, तसेच भक्तीगीते व भजन गायनाने शालेय परिसराचे वातावरण भक्तीमय झाले. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी मागील पौराणिक कथा सांगण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळून आषाढी एकादशीचा आनंद घेतला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत गुरु शिष्यावर आधारित आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे
शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु शिष्यावर आधारित आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी महान अशा गुरु शिष्यावर आधारित एकूण १७ कथा ह्या पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा तसेच गुरुपौर्णिमेच्या सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शाळेत आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन
शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगाचे नाट्यीकरण करून एकूण नऊ नाट्यछटांचे सादरीकरण केले. ऐतिहासिक वारश्याचे जतन तसेच महापुरुषांच्या जीवन कार्याची माहिती देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील दांडगे यांच्या पुण्यतिथीचे आयोजन
शाळेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील दांडगे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रमानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन तसेच भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण .
शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रमानिमित्त तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष उपक्रमांतर्गत अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत तसेच मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकारांचे विविध संगीत वाद्याच्या साह्याने सादरीकरण केले . तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, समूहगीत व गीतांच्या माध्यमातून शालेय परिसरातील वातावरण देशभक्तीमय केले .तसेच शासनाच्या हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत शालेय परिसरात जनजागृती केली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र
मा.श्री.हरिभाऊजी बागडे ( नाना ) यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत खाऊ वाटप
मा.श्री. हरिभाऊजी बागडे ( नाना ) यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत खाऊ वाटप करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र
शाळेत नागपंचमी सणानिमित्त माहिती सत्राचे आयोजन
शाळेत नागपंचमी या सणानिमित्त तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष उपक्रमांतर्गत अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना नागपंचमी सण साजरा करण्यामागील कथा सांगण्यात विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय सर्व सणांची ओळख व त्यामागील महत्त्व पटवून देणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
शाळेत रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष उपक्रमांतर्गत अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत तसेच भारतीय सणांपैकी बहीण भावासाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजेच रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या विद्यार्थ्यांना बांधून हा सण साजरा केला. आपल्या भारतीय संस्कृतीतील विविध सणांची ओळख व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन..
शाळेत रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष उपक्रमांतर्गत अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत तसेच गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या माती पासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. निसर्गाचा समतोल कसा राखावा तसेच निसर्गाशी आपली असलेली बांधिलकी याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शाळेत शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिनाचे आयोजन
शाळेत रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष उपक्रमांतर्गत अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत तसेच भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षकांची सर्व कामे केली. विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली तसेच शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी व गोपाळ काल्याचे आयोजन
शाळेत दहीहंडी व गोपाळकाला निमित्त तसेच तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष उपक्रमांतर्गत अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत दहीहंडी फोडणे हा उपक्रम घेण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे तयार करून विविध प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन केले त्यानंतर राधा व कृष्णा यांच्या वेशात आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडी मागील इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्माचे ही स्थान महत्त्वाचे असते हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र .
शाळेत कै. श्यामसुंदरजी नाईक यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी पुरस्कार २०२३-२४ चे आयोजन
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे मा. सचिव कै. श्यामसुंदरजी नाईक यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी पुरस्कार २०२३-२४ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ मध्ये मुलांमधून सर्व प्रथम तसेच मुलींमधून सर्वप्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याला कै. श्यामसुंदरजी नाईक यांचे सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र व अकरा शेरुपयांचा धनादेश देऊन कौतुक करण्यात आले. सदरील पुरस्काराची २०२३-२४ पासून नव्याने सुरुवात करण्यात आली. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती रंगविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन…
शाळेत गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती रंगविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या विविध रंगांच्या रंगसंगतीची माहिती देणे. आपण तयार केलेली श्री ची मूर्तीच आपण आपल्या घरी बसवणार ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. याप्रसंगी शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र..
शाळेत आपल्या हिंदू संस्कृतीतील बैल पोळा या सणानिमित्त माहिती सत्राचे आयोजन
शाळेत आपल्या हिंदू संस्कृतीतील श्रावण महिन्यातील सर्वात शेवटचा सण म्हणजे बैल पोळा या सणानिमित्त तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष उपक्रमांतर्गत अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना बैलपोळा का साजरा करतात ? त्यामागील कथा तसेच बैलपोळा हा बैलाविषयी वाटणाऱ्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे याची माहिती देण्यात आली. आपण समाजामध्ये राहत असताना इतरांविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता, सहानुभूती तसेच बळीराजा विषयी आदर असावा ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवानिमित्त शाळेत ध्वजारोहणाचे आयोजन
शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवानिमित्त तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी, गरज व तात्कालीन परिस्थिती याविषयी आपले विचार भाषणाच्या माध्यमातून मांडले. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा हा उद्देश ठेवून शाळेने उपक्रम राबविला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना
शाळेत श्री. गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधीं यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीची शालेय परिसरातून ढोल ताशाच्या साह्याने मिरवणूक काढून स्थापना व आरती करण्यात आली. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन..
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना एकात्म मानवतावाद तसेच समाजासाठी आपली असलेली बांधिलकी यांची माहिती देण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत अनंत चतुर्दशी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची मिरवणूक व विसर्जनाचे आयोजन
शाळेत अनंत चतुर्दशी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची ढोल ताशाच्या साह्याने मिरवणूक काढून शाळेत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधीं यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीचे विसर्जन केले . विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक श्रीच्या मूर्तीचे महत्व समजावून सांगणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिनाचे आयोजन..
शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत स्वच्छ्ता ही सेवा या भारत सरकारच्या अभियानांतर्गत कचरा मुक्त भारत बनविण्यासाठी सामूहिक महाश्रमदान स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता दिनाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी शाळेतील शिक्षक , विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मिळून स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शालेय परिसर प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छ केला.तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी या दोन महापुरुषांच्या वेशभूषा हुबेहूब साकारल्या होत्या. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे तसेच शालेय जीवनात स्वतःची कामे स्वतः करावी , आपल्या दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण आहे तसेच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी काराव्यात इ. सवयी विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच रुजाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत दीपावली सणानिमित्त दीपावली सणाविषयी माहिती सत्राचे आयोजन..
शाळेत दीपावली सणानिमित्त तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत दीपावली सणाविषयी माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. दीपावली उत्सवानिमित्त शाळेत दप्तराविना शाळा हा उपक्रम शाळेने राबविला. या उपक्रमाचे विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या पोशाखामध्ये तसेच त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थासह आले व संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अभिनय,कृती, प्रेरणादायक गोष्टी, तसेच आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन व्यथित केला.याप्रकारे विद्यार्थ्यांना आनंद मिळावा म्हणून प्रथम सत्रातील शेवटच्या दिवसाचे नियोजन शाळेने केले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपली धार्मिक परंपरा तसेच दिवाळी सणाशी निगडित विविध दिवसांची माहिती देण्यात आली . आपण दिवाळी सण का साजरा करतो ? त्या मागील पार्श्वभूमी काय आहे ? याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
छत्रपती संभाजीनगर ते सृष्टी ऍग्रो टुरिझम या ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन
शाळेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजीनगर ते सृष्टी ऍग्रो टुरिझम सेंटर याठिकाणी सहलीचे आयोजन केले होते .विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचा अनुभव देणे, आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे, भौगोलिक परिस्थितीची सखोल माहिती देणे, विद्यार्थ्यांमध्ये प्रवासाचे कौशल्य विकसित करणे इ. गोष्टींचा विचार करून सहलीचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विद्यार्थ्यांना याप्रसंगी आपल्या समाजातील Community Helper बद्दल माहिती देऊन त्यांच्या कामाचे स्वरूप याबद्दल प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला व ती आपल्या साठी कसे महत्त्वाचे आहेत हे पटवून देण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध असलेला रेनडान्स चा मनसोक्त आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके जसे की बैलगाडी फेरी, आगगाडी फेरी, मनोरंजनात्मक खेळ असणारे विविध प्रात्यक्षिक स्वतः करून आनंद घेतला. तद नंतर विद्यार्थ्यांनी निसर्ग भोजनाचा एकत्रित आनंद घेतला.त्यातील काही क्षणाचे छायाचित्रे.
छत्रपती संभाजीनगर ते शेगाव दर्शन याठिकाणी दोन दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन
शाळेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजीनगर ते शेगाव दर्शन या ठिकाणी दोन दिवसीय सहलीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचा अनुभव देणे, आपल्या ऐतिहासिक वारशाचे जतन, परिस्थितीशी जुळवून घेणे, भौगोलिक परिस्थितीची सखोल माहिती देणे इ. गोष्टींचा विचार करून सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीमध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व प्रसंगांची माहिती देण्यात आली तसेच सिंदखेड राजा, जिजाऊ जिजाऊ सृष्टी इ. ठिकाणांना भेट देऊन या ठिकाणांविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना शेगाव मधील विविध रम्य दृश्य, विविध प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यात आले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी शेगावला लागून असलेला माऊली वॉटर पार्कचा मनसोक्त आनंद घेतला. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वाटर पार्कशी संबंधित विविध असणारे विविध प्रात्यक्षिक स्वतः करून आनंद घेतला.त्यातील काही क्षणाचे छायाचित्रे.
” प्रगतीच्या पाऊलखुणा ” या हस्तलिखिताच्या निर्मितीबाबत
रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी " प्रगतीच्या पाऊलखुणा " असे शीर्षक असणारे हस्तलिखित तयार केलेले असून त्याचे विमोचन शाळेच्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथींच्या हस्ते होणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा संग्रह केलेल्या कविता, लेख ,चित्र, सामान्य ज्ञान इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना लिखाणाची आवड लागावी, नवनिर्मितीला चालना देणे, भविष्यात जुने वर्गमित्र , त्यांची आठवण,त्यांचे हस्ताक्षर याची आठवण म्हणून हे हस्तलिखित छापील स्वरूपातील प्रति जेणे करून भविष्यात जसे तसे राहील.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेत क्रीडा महोत्सवाचे आयोजन…
रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सांघिक खेळामध्ये मुला -मुलींचे क्रिकेट व खो-खो तसेच कबड्डी व वैयक्तिक मध्ये तीन पायाची शर्यत , चमचा लिंबू अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. Joyful Learning तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढावी, विद्यार्थ्यांना भविष्यात असणाऱ्या खेळाच्या विविध संधीबद्दल माहिती देणे, तसेच अध्ययन -अध्यापन प्रक्रिया मनोरंजन पद्धतीने राबविण्यासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचे आयोजन….
रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेत बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. तसेच शाळेतील काही विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची हुबेहूब वेशभूषा साकारली होती तसेच शाळेतील काही विद्यार्थिनींनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.महिला सशक्तिकरण ( Women Empowerment ) ही काळाची गरज, विद्यार्थ्यांना महान व्यक्ती विषयी माहिती देणे, बालिका दिनाविषयी माहिती देणे या सर्व गोष्टींचा विचार करून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत ” आपले कुटूंब ” ही थीम असलेल्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या रंगीत तालीमेचे आयोजन…
रामचंद्र नाईक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत " आपले कुटूंब " ही थीम असलेल्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या रंगीत तालीमेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांचे व्यासपीठ कौशल्य विकसित करणे व विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यक्रमाचा नियोजनबद्ध सराव करुन घेणे इ. सर्व गोष्टींचा विचार करून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील काही क्षणांचे छायाचित्रे.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन…
शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशात येऊन त्यांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यासमोर उभे केले.तर काही विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर पावर पॉइंट प्रेसेंटेशनच्या माध्यमातून प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती देणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम केला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ” आपले कुटूंब ” ही थीम असणाऱ्या २५ व्या (सत्र -१) वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन..
शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या अंतर्गत " आपले कुटूंब " ही थीम असणाऱ्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र पहिले हे नर्सरी ते इ.१ ली या वर्गासाठी संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १५ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपले कुटूंब या थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच कौटुंबिक संदेशपर नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे
शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ” आपले कुटूंब ” ही थीम असणाऱ्या २५ व्या ( सत्र-२) वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन..
शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या अंतर्गत " आपले कुटूंब " ही थीम असणाऱ्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र दुसरे हे इ.२ री ते इ.५ वी या वर्गासाठी संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण १५ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपले कुटूंब या थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच कौटुंबिक संदेशपर नाट्यछटांचा तसेच समाजातील विविध चुकीच्या चालीरीतीना कशाप्रकारे आपण बदलवू शकतो या प्रकारचा संदेश देणाऱ्या विविध नाट्यछटांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे तसेच सृजनशील समाज निर्मिती व्हावी हा मानस ठेवून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे
शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत आपले कुटूंब ही थीम असणाऱ्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र – तिसरे चे आयोजन
शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत आपले कुटूंब ही थीम असणाऱ्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र – तिसरे हे इ.६ वी ते इ .९ वी या वर्गासाठी संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण १७ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपली आपले कुटूंब ही थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच कौटुंबिक तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता.याच कार्यक्रमात सन २०२२- २३ मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमधील पहिल्या दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे सन्मानचिन्ह ,इ.१० वी ची सनद तसेच पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच इ.९ वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “प्रगतीच्या पाऊलखुणा” असे शिर्षक असलेल्या हस्तलिखिताचे विमोचन देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.
शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्षभरामध्ये आयोजित विविध स्पर्धा तसेच उपक्रमांच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन….
शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्षभरामध्ये आयोजित विविध स्पर्धा तसेच उपक्रमांच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या कार्याची महती सांगणारे मनोगत पर भाषणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारे शौर्य गीत देखील सादर केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले .शाळेतील प्राथमिक, उच्च- प्राथमिक व माध्यमिक या तीन विभागातुन एक स्टुडन्ट ऑफ द इयर २०२३-२४ या शाळेतील मुख्य पुरस्काराचे वितरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेत १०० % उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० % उपस्थितीचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे .
शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन….
शाळेत शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग स्वतः तयार करून त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच कार्य समजावून सांगितले . प्रत्येक गोष्टी मागं विज्ञान असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे व विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला प्रेरणा मिळावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.
शाळेत इ.१० वी च्या नवव्या बॅचच्या निरोप समारंभाचे आयोजन…
शाळेत शाळेच्या इ.१० वी च्या नवव्या बॅचच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . त्याप्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना तसेच शाळेने त्यांच्याविषयी जोपासलेल्या सर्व संस्कारांना मनोगताच्या माध्यमातून उजाळा दिला . तसेच त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते इ.१० वी पर्यंतच्या त्यांच्या प्रवासाची चित्रफित दाखविण्यात आली व शाळेने कशाप्रकारे त्यांच्या आठवणी तसेच बालपण जपून ठेवले आहेत याची त्यांना आठवण करून दिली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री राजेंद्र पवार सर व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री दिपक औटे सर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत आनंद नगरी २०२४ चे आयोजन..
शाळेत विद्यार्थ्यांना व्यापारी जीवनाचा तसेच व्यवहारिक जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून आनंदनगरी २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून विविध खाद्यपदार्थाचे तसेच विविध खेळाचे एकूण ४९ स्टॉल लावले होते . विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये कसे वागावे ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणे तसेच एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींचा अनुभव देणे तसेच विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक क्षेत्राचा तसेच सृजनशक्तीचा विकास व्हावा हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील एका काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे...
रामचंद्र नाईक विद्यालयाचा नवव्या तुकडीचा एस.एस.सी. मार्च 2024 च्या परिक्षेच्या निकालाबाबत ..
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2024 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शाळेच्या नवव्या बॅचचाही मागील सर्व बॅचप्रमाणे 100 % निकाल. इयत्ता 10 वी चे सर्वच विद्यार्थी हे 69 टक्केपेक्षा जास्त टक्केवारीने उत्तीर्ण, 75 टक्केपेक्षा जास्त 50 विद्यार्थी व 90 टक्केपेक्षा जास्त गुण संपादन करुन 7 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत,सोबत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल यादी
शाळेत शाळेचा पहिला दिवस तसेच बालब्रम्हाच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन…
शाळेत शाळेचा पहिला दिवस तसेच बालब्रम्हाच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत म्हणजेच बालब्रह्माचे स्वागतही करण्यात आले. याप्रसंगी शाळेत वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती तसेच संविधानाचा अर्थही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. शाळेत आनंददायी शिक्षण पद्धती राबविणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेत योग शिबिराचे आयोजन..
शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेत विविध योगासने तसेच प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना त्याचे फायदे समजावून सांगण्यात आले. तसेच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडुन विविध योगासने तसेच प्राणायामंचा सराव करुन घेण्यात आला.२१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व तसेच योग व प्राणायाम यांचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे तसेच लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम तसेच आरोग्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण व्हावी हा मानस ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन….
शाळेत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा तसेच २१ व्या शतकातील स्पर्धेला सामोरे जाण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावे हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
शाळेत शालेय संसद निवडणूकीचे आयोजन..
शालेय संसद निवडणूक ही प्रत्यक्ष मतदान पद्धतीने घेण्यात आली. मताधिक्याने निवडून आलेल्या नवनिर्वाचित उमेदवारांमधून एकाची वर्ग प्रतिनिधी व दुसऱ्याची उपवर्ग प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना याप्रसंगी लोकशाहीचे महत्त्व तसेच लोकशाही मधील लोकप्रतिनिधीचे कार्य व अधिकार याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव देणे तसेच लोकशाही मध्ये आपण अप्रत्यक्षरित्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्याला हवा तो बदल करु शकतो हि भावना विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी वेशभूषा स्पर्धा तसेच वृक्ष दिंडीचे आयोजन…
शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वृक्ष दिंडी तसेच वारकरी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकऱ्याची तसेच विठ्ठल रखुमाई यांच्या वेशभूषा धारण केलेल्या होत्या. शालेय परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी व निसर्ग हा देव हि भावना वाढीस लागावी म्हणून वृक्षदिंडी काढण्यात आली तदप्रसंगी भक्ती गीते व भजन गायनाने शालेय परिसराचे वातावरण भक्तीमय झाले. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी मागील पौराणिक कथा सांगण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळून व भक्तीगीताचे गायण करून आषाढी एकादशीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना विविध सणांची माहिती देणे तसेच आपला ऐतिहासिक वारसा जपणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..
शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूशिष्यावर आधारित कथाकथन स्पर्धेचे आयोजन..
शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु शिष्यावर आधारित आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी महान अशा गुरु शिष्यावर आधारित एकूण १७ कथा ह्या पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर केल्या तसेच विद्यार्थ्यांना आदर्श अशा गुरु- शिष्याविषयी माहिती देण्यात आली.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा तसेच शिक्षणाबरोबर भारतीय सण,संस्कृती व परंपरा यांचे रक्षण करणे व गुरुपौर्णिमेच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणे हा मानस ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शालेय संसद निवडणूक व शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..
शाळेत शालेय संसद निवडणूक ही प्रत्यक्ष मतदान पद्धतीने घेण्यात आली.निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांमधून संसदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर सदस्या मधून शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना याप्रसंगी लोकशाहीचे महत्त्व तसेच लोकशाही मधील लोकप्रतिनिधीचे कार्य व अधिकार याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकशाही मधील आपले अधिकार व कर्तव्य याची जाणीव करून देणे तसेच संसदेचा कारभार कशा पद्धतीने चालतो ? याची ओळख करून देणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शाळेत वेशभूषा वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..
शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या दोन मान व्यक्तींच्या वेशभूषेवर आधारित आंतरशालेय वेशभूषा वकृत्व कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील एकूण १८ विद्यार्थ्यांनी या दोन महापुरुषांच्या वेशभूषा धारण करून त्यांच्या विषयी आपले विचार मांडले तसेच त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला प्रेरणा व ऐतिहासिक वारश्याचे जतन तसेच महापुरुषांच्या जीवनकार्याची माहिती देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत नागपंचमी सणानिमित्त माहिती सत्राचे आयोजन..
शाळेत नागपंचमी या सणानिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना नागपंचमी सण साजरा करण्यामागील कथा तसेच नागपंचमी सणाचे महत्त्व सांगण्यात आले .विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय सर्व सणांची ओळख व त्यामागील महत्त्व पटवून देणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र
शाळेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील दांडगे यांच्या पुण्यतिथी निमित्त आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन..
शाळेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील दांडगे यांची पुण्यतिथी निमित्त आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील निबंध स्पर्धेत शाळेतील १००% विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे .
शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत तीन दिवसीय ध्वजारोहणाचे आयोजन….
शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा या महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेअंतर्गत विविध कवायत प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने रिंग कवायत, घुंगुर काठी कवायत, डंबेल्स कवायत, झेंडा कवायत व लेझीम कवायत इ. कवायत प्रकारांचा समावेश होता. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत शाळेत दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ असे एकूण तीन दिवसीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे त्यातील आजच्या पहिल्या सत्राचे ध्वजारोहण करण्यात आले. तदप्रसंगी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतीके व आपली कर्तव्य याबद्दल माहिती देण्यात आली. त्यातील काही निवडक क्षणांची क्षणचित्रे.
शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत तीन दिवसीय ध्वजारोहणाचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ..
शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा या महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेअंतर्गत विविध कवायत प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने रिंग कवायत, घुंगुर काठी कवायत, डंबेल्स कवायत, झेंडा कवायत व लेझीम कवायत इ. कवायत प्रकारांचा समावेश होता. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत शाळेत दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ असे एकूण तीन दिवसीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे त्यातील आज दुसऱ्या दिवशीचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वातंत्र्य दिनाबद्दलचे विचार भाषणरुपी मराठी ,हिंदी व इंग्रजी या भाषेतून मांडले. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांना आपली कर्तव्य व जबाबदारी यांची जाणीव बालवयातच करून देणे हा उद्देश ठेवून शाळेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
शाळेत भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विविध स्पर्धांचे तसेच तीन दिवसीय ध्वजारोहणाचे आयोजन …
शाळेत भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विविध स्पर्धांचे तसेच तीन दिवसीय ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकारांचे विविध संगीत वाद्याच्या साह्याने सादरीकरण केले . तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, समूहगीत व देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून शालेय परिसरातील वातावरण देशभक्तीमय केले .तसेच शासनाच्या हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत शालेय परिसरात जनजागृती केली.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
मा.राज्यपाल श्री.हरिभाऊजी बागडे ( नाना ) यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत खाऊ वाटप
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तसेच भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान या राज्याचे "मा.राज्यपाल" मा.श्री. हरिभाऊजी बागडे ( नाना ) यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांना एक सामान्य व्यक्ती ते राज्यपाल या प्रवासामध्ये त्यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती देण्यात आली. Nothing is Impossible Due to Hardwork या उक्तीप्रमाणे आपले आयुष्य घडत असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रूढ करणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र
शाळेत रक्षाबंधन या सणानिमित्त रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन…
शाळेत भारतीय सणांपैकी बहीण भावासाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजेच रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्त्व तसेच त्या मागील पौराणिक कथा सांगण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनींनी राख्या विद्यार्थ्यांना बांधून हा सण साजरा केला. त्यामध्ये काही विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचा समावेश होता.आपल्या भारतीय संस्कृतीतील विविध सणांची ओळख व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला .त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र
शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी व गोपाळ काल्याचे आयोजन..
शाळेत दहीहंडी व गोपाळकाला निमित्त दहीहंडी फोडणे हा उपक्रम घेण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे तयार करून विविध प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन केले त्यानंतर राधा व कृष्णा यांच्या वेशात आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडी मागील इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्माचे ही स्थान महत्त्वाचे असते हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र .
शाळेत शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन..
शाळेत गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या माती पासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. निसर्गाचा समतोल कसा राखावा तसेच निसर्गाशी आपली असलेली बांधिलकी याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही क्षणांचे क्षणचित्रे.
शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तसेच आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत दप्तर मुक्त शाळा तसेच शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती रंगविण्याच्या कार्यशाळेचे व विविध खेळांचे आयोजन…
शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती रंगविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. तसेच आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विविध खेळांचे आयोजन देखील करण्यात आले.त्यात प्रामुख्याने दप्तर मुक्त शाळा तसेच विद्यार्थ्यांना आनंद देणाऱ्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या विविध रंगांच्या रंगसंगतीची माहिती देणे. आपण तयार केलेली श्री ची मूर्तीच आपण आपल्या घरी बसवणार ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. याप्रसंगी शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..
शाळेत आपल्या हिंदू संस्कृतीतील बैल पोळा या सणानिमित्त माहिती सत्राचे आयोजन…
शाळेत आपल्या हिंदू संस्कृतीतील श्रावण महिन्यातील सर्वात शेवटचा सण म्हणजे बैल पोळा या सणानिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना बैलपोळा का साजरा करतात ? त्यामागील कथा तसेच बैलपोळा हा बैलाविषयी वाटणाऱ्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे याची माहिती देण्यात आली. आपण समाजामध्ये राहत असताना इतरांविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता, सहानुभूती तसेच बळीराजा विषयी आदर असावा ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शाळेत शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिनाचे आयोजन..
शाळेत भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षकांची सर्व कामे केली. विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच " *Every Teacher Is Columbus Of His Method Or Subject*" या संकल्पनेप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली तसेच शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना…
शाळेत श्री गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सर्व सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधी यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीची स्थापना व आरती केली. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र .
शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचे आयोजन..
शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी, गरज व तात्कालीन परिस्थिती याविषयी आपले विचार भाषणाच्या माध्यमातून मांडले. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा तसेच *"A Good Education Is Foundation For Better Future"* हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत अनंत चतुर्दशी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची मिरवणूक व विसर्जनाचे आयोजन…
शाळेत अनंत चतुर्दशी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची ढोल ताशाच्या साह्याने मिरवणूक काढून शाळेत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधीं यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीचे विसर्जन केले . विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक श्रीच्या मूर्तीचे महत्व समजावून सांगणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन..
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना एकात्मक मानवतावाद तसेच समाजासाठी आपली असलेली बांधिलकी यांची माहिती देण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.