रामचंद्र नाईक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते. Educate a girl and she will definitely change the world या वाक्याप्रमाणे स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश टाकणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. तसेच शाळेतील काही विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची हुबेहूब वेशभूषा साकारली होती तसेच शाळेतील काही विद्यार्थिनींनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.महिला सशक्तिकरण ( Women Empowerment ) ही काळाची गरज, विद्यार्थ्यांना महान व्यक्ती विषयी माहिती देणे, बालिका दिनाविषयी माहिती देणे या सर्व गोष्टींचा विचार करून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र…
रामचंद्र नाईक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते. Educate a girl and she will definitely change the world या वाक्याप्रमाणे स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश टाकणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. तसेच शाळेतील काही विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची हुबेहूब वेशभूषा साकारली होती तसेच शाळेतील काही विद्यार्थिनींनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.महिला सशक्तिकरण ( Women Empowerment ) ही काळाची गरज, विद्यार्थ्यांना महान व्यक्ती विषयी माहिती देणे, बालिका दिनाविषयी माहिती देणे या सर्व गोष्टींचा विचार करून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र...
रामचंद्र नाईक विद्यालयाच्या २६ व्या " आपले सण व उत्सव " ही थीम असणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी Literature is a collection of written or oral works that can be used to record, preserve, and transmit knowledge and entertainment या उक्तीप्रमाणे “ नवी दिशा “ असे शीर्षक असणारे हस्तलिखित तयार केलेले असून त्याचे विमोचन शाळेच्या २६ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये ३० जानेवारी २०२५ रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा संग्रह केलेल्या कविता, लेख ,चित्र, सामान्य ज्ञान इत्यादींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना लिखाणाची आवड लागावी, विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीला चालना देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. भविष्यात जुने वर्गमित्र , त्यांची आठवण,त्यांचे हस्ताक्षर याची आठवण म्हणून हे हस्तलिखित छापील स्वरूपातील प्रति जेणे करून भविष्यात जशास तसे राहील. या हस्तलिखिताच्या निर्मितीमध्ये इ.९ वी मधील एकुण ५३ विद्यार्थ्यांनी माहितीचे संकलन केलेले आहे. हस्तलिखिताच्या पृष्ठावरील एका क्षणांचे छायाचित्र.
स्थळ:-( दिवस - चौथा ) श्रीरामपूर येथील लक्ष्मी वॉटर पार्क
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेने चार दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.The world is full of wonderful things you haven't seen yet या उक्तीप्रमाणे तीप्रमाणे श्रीरामपूर येथील लक्ष्मी वाढ पार्कमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घेतला. त्यात प्रामुख्याने स्लाइडिंग, हॉर्स रायडिंग, बोटिंग, रेन डान्स आणि इतर भरपूर अशा ऍक्टिव्हिटीजचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. तसेच त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात स्नेहभोजनाचा आनंदही घेतला.Travel not to find yourself, but to remember who you've been all along याप्रकारच्या शैक्षणिक अनुभुती विद्यार्थ्यांना मिळाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..
स्थळ:-(दिवस - तिसरा ) रंकाळा तलाव, महालक्ष्मी दर्शन तसेच कनेरी मठ
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेने चार दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.Traveling allows you to become so many dif- ferent versions of your self या उक्तीप्रमाणे चार दिवसाच्या सहलीमध्ये तिसऱ्या दिवशी कोल्हापूर मधील प्रसिद्ध असा रंकाळा तलावाची भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या महालक्ष्मी मातेचे दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले. तसेच सिद्धगिरी मठातील प्रसिद्ध अशा विविध देखाव्यांचा आनंद देखील घेतला त्यात प्रामुख्याने माया महल, भुतं. बंगला, म्युझियम मध्ये १०८ ऋषींच्या प्रतिकृती तसेच आकाशगंगा व सौरमालेतील ग्रह यांची माहिती 7D शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली . तसेच काही मनोरंजनात्मक खेळही विद्यार्थ्यांचे घेण्यात आले.Travel is the best teacher. The only way to an open mind is by taking a plane out into the open world.याप्रकारच्या शैक्षणिक अनुभुती विद्यार्थ्यांना मिळाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र..
स्थळ:-( दिवस -दुसरा ) शाहू पॅलेस,ज्योतीबा दर्शन तसेच पन्हाळ गड
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेने चार दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.Travelling is the true Education या उक्तीप्रमाणे चार दिवसाच्या सहलीमध्ये दुसऱ्या दिवशी शाहू पॅलेस, ज्योतिबा दर्शन तसेच महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक असणारा पन्हाळ गड याठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणांची भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पन्हाळ गडावर शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग तसेच घटना पन्हाळ गडाशी संबंधित असणाऱ्या ठिकाणांना भेट देऊन माहिती देण्यात आली.तसेच पन्हाळगडाच्या निसर्गरम्य व शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श झालेल्या भुमीत विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. Travel makes you realise that no matter how much you know, there is more to learn.याप्रकारच्या शैक्षणिक अनुभुती विद्यार्थ्यांना मिळाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र..
स्थळ:-(दिवस -पहिला) शनिशिंगणापूर व श्री मोरेश्वर गणपती दर्शन..
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेने चार दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.NOT ALL CLASSROOMS HAVE FOUR WALLS या उक्तीप्रमाणे चार दिवसाच्या सहलीमध्ये पहिल्या दिवशी शनिशिंगणापूर तसेच अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या श्री मोरेश्वर गणपतीचे दर्शन देखील विद्यार्थ्यांनी घेतले तसेच शनिशिंगणापूर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य वातावरणामध्ये स्नेहभोजनाचा आनंद घेतला. Adjustment is the part of life as well as Travel makes you realise that no matter how much you know, there is more to learn. याप्रकारच्या शैक्षणिक अनुभुती विद्यार्थ्यांना मिळाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेने स्थानिक एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. NOT ALL CLASSROOMS HAVE FOUR WALLS या उक्तीप्रमाणे खटोड फार्म याठिकाणी विद्यार्थ्यांच्या गटानुसार विविध ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या त्यामध्ये कॅमल राइडिंग, घोडा गाडी, ट्रेन, झिप लाईन, वेगवेगळ्या प्रकारच्या टायर क्लाइंबिंग, पाण्यातील बोटिंग तसेच विविध प्रकारच्या कला यांचे प्रत्यक्ष सादरीकरण त्यात प्रामुख्याने माती पासून विविध भांडी बनवणे, राजस्थानी नृत्य, मॅजिक शो, पपेट शो, स्टिक वॉकर इ.समावेश होता तसेच विद्यार्थ्यांना आनंद मिळावा म्हणून रेन डान्स, नेमबाजी, बलून शूटिंग, फुटबॉल इ.खेळ देखील गटानुसार घेण्यात आले. तेथे विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आनंद देखील घेतला. विद्यार्थ्यांना साखर कशी तयार होते याचे प्रत्यक्ष क्षेत्रभेटी च्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे साखर कारखाना चितेगाव या ठिकाणच्या साखर कारखान्यास प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना कुतूहल वाटणाऱ्या तसेच साखर प्रक्रिये संदर्भात पडलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळाली. तसेच विद्यार्थ्यांना साखर कारखान्यातील साखरेचा आस्वाद घेण्याचा आनंदही मिळाला.Travel makes you realise that no matter how much you know, there is more to learn. याप्रकारच्या शैक्षणिक अनुभुती विद्यार्थ्यांना मिळाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..
शाळेत दीपावली सणानिमित्त दीपावली सेलिब्रेशन तसेच दीपावली सणाविषयी माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. दीपावली उत्सवानिमित्त शाळेत "*दप्तराविना शाळा*" हा उपक्रम राबविण्यात आला. *"A GOOD LIFE IS A COLLECTION OF HAPPY MEMORIES."* या उक्तीप्रमाणे या उपक्रमाचे विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या पोशाखामध्ये तसेच त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थासह आले व संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अभिनय,कृती, प्रेरणादायक गोष्टी, तसेच आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन व्यथित केला.याप्रकारे विद्यार्थ्यांना आनंद मिळावा म्हणून प्रथम सत्रातील शेवटच्या दिवसाचे नियोजन शाळेने केले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपली धार्मिक परंपरा तसेच दिवाळी सणाशी निगडित विविध दिवसांची माहिती देण्यात आली . आपण दिवाळी सण का साजरा करतो ? त्या मागील पार्श्वभूमी काय आहे ? याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे तसेच धार्मिक परंपरेची जोपासना करणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे
शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत " स्वच्छ्ता ही सेवा "या भारत सरकारच्या अभियानांतर्गत स्वच्छता दिनाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी "Cleanliness is the foundation of a healthy and happy life " या उक्तीप्रमाणे शाळेतील शिक्षक , विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मिळून स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शालेय परिसर प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छ केला.तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी या दोन महापुरुषांच्या वेशभूषा हुबेहूब साकारल्या होत्या. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे तसेच शालेय जीवनात स्वतःची कामे स्वतः करावी , आपल्या दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण आहे तसेच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी काराव्यात इ. सवयी विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच रुजाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्रे.
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना एकात्मक मानवतावाद तसेच समाजासाठी आपली असलेली बांधिलकी यांची माहिती देण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत अनंत चतुर्दशी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची ढोल ताशाच्या साह्याने मिरवणूक काढून शाळेत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधीं यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीचे विसर्जन केले . विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक श्रीच्या मूर्तीचे महत्व समजावून सांगणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी, गरज व तात्कालीन परिस्थिती याविषयी आपले विचार भाषणाच्या माध्यमातून मांडले. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा तसेच *"A Good Education Is Foundation For Better Future"* हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत श्री गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सर्व सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधी यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीची स्थापना व आरती केली. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र .
शाळेत भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षकांची सर्व कामे केली. विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच " *Every Teacher Is Columbus Of His Method Or Subject*" या संकल्पनेप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली तसेच शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत आपल्या हिंदू संस्कृतीतील श्रावण महिन्यातील सर्वात शेवटचा सण म्हणजे बैल पोळा या सणानिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना बैलपोळा का साजरा करतात ? त्यामागील कथा तसेच बैलपोळा हा बैलाविषयी वाटणाऱ्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे याची माहिती देण्यात आली. आपण समाजामध्ये राहत असताना इतरांविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता, सहानुभूती तसेच बळीराजा विषयी आदर असावा ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती रंगविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. तसेच आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विविध खेळांचे आयोजन देखील करण्यात आले.त्यात प्रामुख्याने दप्तर मुक्त शाळा तसेच विद्यार्थ्यांना आनंद देणाऱ्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या विविध रंगांच्या रंगसंगतीची माहिती देणे. आपण तयार केलेली श्री ची मूर्तीच आपण आपल्या घरी बसवणार ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. याप्रसंगी शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..
शाळेत गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या माती पासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. निसर्गाचा समतोल कसा राखावा तसेच निसर्गाशी आपली असलेली बांधिलकी याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही क्षणांचे क्षणचित्रे.
शाळेत दहीहंडी व गोपाळकाला निमित्त दहीहंडी फोडणे हा उपक्रम घेण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे तयार करून विविध प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन केले त्यानंतर राधा व कृष्णा यांच्या वेशात आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडी मागील इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्माचे ही स्थान महत्त्वाचे असते हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र .
शाळेत भारतीय सणांपैकी बहीण भावासाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजेच रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्त्व तसेच त्या मागील पौराणिक कथा सांगण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनींनी राख्या विद्यार्थ्यांना बांधून हा सण साजरा केला. त्यामध्ये काही विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचा समावेश होता.आपल्या भारतीय संस्कृतीतील विविध सणांची ओळख व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला .त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तसेच भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान या राज्याचे "मा.राज्यपाल" मा.श्री. हरिभाऊजी बागडे ( नाना ) यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांना एक सामान्य व्यक्ती ते राज्यपाल या प्रवासामध्ये त्यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती देण्यात आली. Nothing is Impossible Due to Hardwork या उक्तीप्रमाणे आपले आयुष्य घडत असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रूढ करणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र