“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

शाळेत भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचे आयोजन…

26 JANUARY 2025

शाळेत भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .”Freedom in the mind, Strength in the words, Pride in our souls, Zeal in our hearts, Let’s salute our great country on Republic Day” या वाक्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत तसेच स्वागत गीत सादर केले तर काही विद्यार्थ्यांनी संविधानाची आवश्यकता, संविधान निर्मितीची प्रक्रिया, सध्या भारतातील स्थिती, भारत एक महासत्ता अशा विविध विषयावरती आपल्या मनोगतपर भाषणातून प्रकाश टाकला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकारांचे विविध संगीत वाद्याच्या साह्याने सादरीकरण केले.नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून शंभर टक्के विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग म्हणून या कवायत प्रकाराचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी कोणत्या ना कोणत्या कवायत प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे,एकजुटीची भावना, देशप्रेम ,स्वावलंबन इत्यादी गुणांना प्रेरणा मिळावी म्हणून शाळेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमातील विविध देशभक्तीपर उपक्रमामुळे शालेय वातावरण देशभक्तीमय झाले. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे .

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by