Education is the most powerful weapon which you can use to change the world.” – Nelson Mandela

शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत तीन दिवसीय ध्वजारोहणाचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ..

14 AUGUST 2024

शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा या महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेअंतर्गत विविध कवायत प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने रिंग कवायत, घुंगुर काठी कवायत, डंबेल्स कवायत, झेंडा कवायत व लेझीम कवायत इ. कवायत प्रकारांचा समावेश होता. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत शाळेत दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ असे एकूण तीन दिवसीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे त्यातील आज दुसऱ्या दिवशीचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वातंत्र्य दिनाबद्दलचे विचार भाषणरुपी मराठी ,हिंदी व इंग्रजी या भाषेतून मांडले. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांना आपली कर्तव्य व जबाबदारी यांची जाणीव बालवयातच करून देणे हा उद्देश ठेवून शाळेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.

News & Events

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by