“Education is the movement from darkness to light” – Allan Bloom

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन.

19 FEBRUARY 2025

शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त “The best preparation for tomorrow is doing your best today” या वाक्याप्रमाणे वर्षभरामध्ये आयोजित विविध स्पर्धा तसेच उपक्रमांच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या कार्याची महती सांगणारे मनोगत पर भाषणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारे शौर्य गीत देखील सादर केले. तर काही विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले .शाळेतील प्राथमिक, उच्च- प्राथमिक व माध्यमिक या तीन विभागातुन एक स्टुडन्ट ऑफ द इयर २०२४-२५ या शाळेतील मुख्य पुरस्काराचे वितरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेत १०० % उपस्थित असणाऱ्या एकुण ५५ विद्यार्थ्यांना १०० % उपस्थितीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.”Keep your face always toward the sunshine and shadows will fall behind you” तसेच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार करणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.

News & Events

© Copyright 2025 - Ramchandra Naik School | Designed by