Education is the most powerful weapon which you can use to change the world.” – Nelson Mandela

शाळेचे कोल्हापूर याठिकाणी विविध प्रेक्षणीय स्थळांचे तसेच क्षेत्रभेटीचे चार दिवसीय शैक्षणिक सहलीच्या रूपाने क्षेत्रभेटीचे आयोजन…

18 DECEMBER 2024

स्थळ:-( दिवस -दुसरा ) शाहू पॅलेस,ज्योतीबा दर्शन तसेच पन्हाळ गड

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेने चार दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.Travelling is the true Education या उक्तीप्रमाणे चार दिवसाच्या सहलीमध्ये दुसऱ्या दिवशी शाहू पॅलेस, ज्योतिबा दर्शन तसेच महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक असणारा पन्हाळ गड याठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणांची भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पन्हाळ गडावर शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग तसेच घटना पन्हाळ गडाशी संबंधित असणाऱ्या ठिकाणांना भेट देऊन माहिती देण्यात आली.तसेच पन्हाळगडाच्या निसर्गरम्य व शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श झालेल्या भुमीत विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. Travel makes you realise that no matter how much you know, there is more to learn.याप्रकारच्या शैक्षणिक अनुभुती विद्यार्थ्यांना मिळाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र..

News & Events

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by