शाळेत आपल्या हिंदू संस्कृतीतील श्रावण महिन्यातील सर्वात शेवटचा सण म्हणजे बैल पोळा या सणानिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना बैलपोळा का साजरा करतात ? त्यामागील कथा तसेच बैलपोळा हा बैलाविषयी वाटणाऱ्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे याची माहिती देण्यात आली. आपण समाजामध्ये राहत असताना इतरांविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता, सहानुभूती तसेच बळीराजा विषयी आदर असावा ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत दीपावली सणानिमित्त दीपावली सेलिब्रेशन तसेच दीपावली सणाविषयी माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. दीपावली उत्सवानिमित्त शाळेत "*दप्तराविना शाळा*" हा उपक्रम राबविण्यात आला. *"A GOOD LIFE IS A COLLECTION OF HAPPY MEMORIES."* या उक्तीप्रमाणे या उपक्रमाचे विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या पोशाखामध्ये तसेच त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थासह आले व संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अभिनय,कृती, प्रेरणादायक गोष्टी, तसेच आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन व्यथित केला.याप्रकारे विद्यार्थ्यांना आनंद मिळावा म्हणून प्रथम सत्रातील शेवटच्या दिवसाचे नियोजन शाळेने केले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपली धार्मिक परंपरा तसेच दिवाळी सणाशी निगडित विविध दिवसांची माहिती देण्यात आली . आपण दिवाळी सण का साजरा करतो ? त्या मागील पार्श्वभूमी काय आहे ? याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे तसेच धार्मिक परंपरेची जोपासना करणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे
शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत " स्वच्छ्ता ही सेवा "या भारत सरकारच्या अभियानांतर्गत स्वच्छता दिनाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी "Cleanliness is the foundation of a healthy and happy life " या उक्तीप्रमाणे शाळेतील शिक्षक , विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मिळून स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शालेय परिसर प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छ केला.तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी या दोन महापुरुषांच्या वेशभूषा हुबेहूब साकारल्या होत्या. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे तसेच शालेय जीवनात स्वतःची कामे स्वतः करावी , आपल्या दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण आहे तसेच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी काराव्यात इ. सवयी विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच रुजाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्रे.
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना एकात्मक मानवतावाद तसेच समाजासाठी आपली असलेली बांधिलकी यांची माहिती देण्यात आली.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत अनंत चतुर्दशी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची ढोल ताशाच्या साह्याने मिरवणूक काढून शाळेत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधीं यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीचे विसर्जन केले . विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक श्रीच्या मूर्तीचे महत्व समजावून सांगणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची पार्श्वभूमी, गरज व तात्कालीन परिस्थिती याविषयी आपले विचार भाषणाच्या माध्यमातून मांडले. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा तसेच *"A Good Education Is Foundation For Better Future"* हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत श्री गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शालेय संसदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सर्व सदस्य तसेच वर्ग प्रतिनिधी व उपवर्ग प्रतिनिधी यांनी शाळेत उपस्थित राहुन श्री च्या मूर्तीची स्थापना व आरती केली. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र .
शाळेत भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षकांची सर्व कामे केली. विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच " *Every Teacher Is Columbus Of His Method Or Subject*" या संकल्पनेप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली तसेच शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत आपल्या हिंदू संस्कृतीतील श्रावण महिन्यातील सर्वात शेवटचा सण म्हणजे बैल पोळा या सणानिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना बैलपोळा का साजरा करतात ? त्यामागील कथा तसेच बैलपोळा हा बैलाविषयी वाटणाऱ्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे याची माहिती देण्यात आली. आपण समाजामध्ये राहत असताना इतरांविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञता, सहानुभूती तसेच बळीराजा विषयी आदर असावा ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती रंगविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. तसेच आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विविध खेळांचे आयोजन देखील करण्यात आले.त्यात प्रामुख्याने दप्तर मुक्त शाळा तसेच विद्यार्थ्यांना आनंद देणाऱ्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या विविध रंगांच्या रंगसंगतीची माहिती देणे. आपण तयार केलेली श्री ची मूर्तीच आपण आपल्या घरी बसवणार ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. याप्रसंगी शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..
शाळेत गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या माती पासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे फायदे समजावून सांगण्यात आले. निसर्गाचा समतोल कसा राखावा तसेच निसर्गाशी आपली असलेली बांधिलकी याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही क्षणांचे क्षणचित्रे.
शाळेत दहीहंडी व गोपाळकाला निमित्त दहीहंडी फोडणे हा उपक्रम घेण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे तयार करून विविध प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन केले त्यानंतर राधा व कृष्णा यांच्या वेशात आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडी मागील इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्माचे ही स्थान महत्त्वाचे असते हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र .
शाळेत भारतीय सणांपैकी बहीण भावासाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजेच रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्त्व तसेच त्या मागील पौराणिक कथा सांगण्यात आली. शाळेतील विद्यार्थिनींनी राख्या विद्यार्थ्यांना बांधून हा सण साजरा केला. त्यामध्ये काही विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचा समावेश होता.आपल्या भारतीय संस्कृतीतील विविध सणांची ओळख व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला .त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तसेच भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान या राज्याचे "मा.राज्यपाल" मा.श्री. हरिभाऊजी बागडे ( नाना ) यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांना एक सामान्य व्यक्ती ते राज्यपाल या प्रवासामध्ये त्यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती देण्यात आली. Nothing is Impossible Due to Hardwork या उक्तीप्रमाणे आपले आयुष्य घडत असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रूढ करणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र
शाळेत भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विविध स्पर्धांचे तसेच तीन दिवसीय ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकारांचे विविध संगीत वाद्याच्या साह्याने सादरीकरण केले . तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, समूहगीत व देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून शालेय परिसरातील वातावरण देशभक्तीमय केले .तसेच शासनाच्या हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत शालेय परिसरात जनजागृती केली.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा या महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेअंतर्गत विविध कवायत प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने रिंग कवायत, घुंगुर काठी कवायत, डंबेल्स कवायत, झेंडा कवायत व लेझीम कवायत इ. कवायत प्रकारांचा समावेश होता. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत शाळेत दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ असे एकूण तीन दिवसीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे त्यातील आज दुसऱ्या दिवशीचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वातंत्र्य दिनाबद्दलचे विचार भाषणरुपी मराठी ,हिंदी व इंग्रजी या भाषेतून मांडले. विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांना आपली कर्तव्य व जबाबदारी यांची जाणीव बालवयातच करून देणे हा उद्देश ठेवून शाळेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा या महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेअंतर्गत विविध कवायत प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने रिंग कवायत, घुंगुर काठी कवायत, डंबेल्स कवायत, झेंडा कवायत व लेझीम कवायत इ. कवायत प्रकारांचा समावेश होता. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत शाळेत दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ असे एकूण तीन दिवसीय ध्वजारोहण करण्यात येणार आहे त्यातील आजच्या पहिल्या सत्राचे ध्वजारोहण करण्यात आले. तदप्रसंगी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतीके व आपली कर्तव्य याबद्दल माहिती देण्यात आली. त्यातील काही निवडक क्षणांची क्षणचित्रे.
शाळेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील दांडगे यांची पुण्यतिथी निमित्त आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील निबंध स्पर्धेत शाळेतील १००% विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे .
शाळेत नागपंचमी या सणानिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना नागपंचमी सण साजरा करण्यामागील कथा तसेच नागपंचमी सणाचे महत्त्व सांगण्यात आले .विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय सर्व सणांची ओळख व त्यामागील महत्त्व पटवून देणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका क्षणाचे छायाचित्र
शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या दोन मान व्यक्तींच्या वेशभूषेवर आधारित आंतरशालेय वेशभूषा वकृत्व कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील एकूण १८ विद्यार्थ्यांनी या दोन महापुरुषांच्या वेशभूषा धारण करून त्यांच्या विषयी आपले विचार मांडले तसेच त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला प्रेरणा व ऐतिहासिक वारश्याचे जतन तसेच महापुरुषांच्या जीवनकार्याची माहिती देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत शालेय संसद निवडणूक ही प्रत्यक्ष मतदान पद्धतीने घेण्यात आली.निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांमधून संसदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर सदस्या मधून शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना याप्रसंगी लोकशाहीचे महत्त्व तसेच लोकशाही मधील लोकप्रतिनिधीचे कार्य व अधिकार याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना लोकशाही मधील आपले अधिकार व कर्तव्य याची जाणीव करून देणे तसेच संसदेचा कारभार कशा पद्धतीने चालतो ? याची ओळख करून देणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.