खेळ:- कबड्डी व तीन पायांची शर्यत
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये इ.१ ली ते इ.४ थी साठी तीन पायाची शर्यत व इ.५ वी ते इ.८ वी साठी -कबड्डी हे खेळ दि.०३.०२.२०२५ रोजी घेण्यात आले.”Life is more fun if you play games” तसेच “Learning By Doing” याप्रकारचे मूल्य विद्यार्थ्यात रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात खेळाचे महत्व पटवून देणे, शरीर हीच संपत्ती आहे तसेच खेळाचे आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.