“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr.

शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन…

28 FEBRUARY 2026

शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ” The science of today is the technology of tomorrow.“ या विचाराप्रमाणे आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग स्वतः तयार करून त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच कार्य समजावून सांगितले . यामध्ये एकूण इ.१ ली ते इ.९ वी पर्यंत प्रत्येक वर्गाचा एक याप्रमाणे १७ व वैयक्तिक स्वरूपाचे ४४ प्रयोग असे एकूण ६१ प्रयोग या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात मांडले होते.प्रत्येक गोष्टी मागं विज्ञान असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे व विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला प्रेरणा मिळावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by