“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी वेशभूषा स्पर्धा तसेच वृक्ष दिंडीचे आयोजन…

24 JULY 2026

शाळेत “𝐍𝐚𝐭𝐮𝐫𝐞 𝐈𝐬 𝐓𝐡𝐞 𝐀𝐫𝐭 𝐎𝐟 𝐆𝐨𝐝” या उक्तीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त वृक्ष दिंडी तसेच वारकरी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकऱ्याची तसेच विठ्ठल रखुमाई यांच्या वेशभूषा धारण केलेल्या होत्या. शालेय परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी व “Everything In Nature Invites Us Constantly To Be What We Are “हि भावना वाढीस लागावी म्हणून वृक्षदिंडी काढण्यात आली तदप्रसंगी भक्ती गीते व भजन गायनाने शालेय परिसराचे वातावरण भक्तीमय झाले. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी मागील पौराणिक कथा सांगण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळून व भक्तीगीताचे गायण करून आषाढी एकादशीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना विविध सणांची माहिती देणे तसेच आपला ऐतिहासिक वारसा जपणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by