“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr.

शाळेत मा.महामहिम राज्यपाल मा.श्री.हरिभाऊजी बागडे नाना यांचे विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासंबंधी मार्गदर्शन …

04 MARCH 2026

शाळेत भारतभुमी वरील सर्वात मोठ्या राज्याचे महामहिम मा.राज्यपाल तसेच पंडित दीनदाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे मा.अध्यक्ष मा.श्री.हरिभाऊजी बागडे नाना यांनी भेट देली. तदप्रसंगी महामहीम राज्यपाल महोदयांना रामचंद्र नाईक विद्यालयाच्या स्थापने पासुन ते आजपर्यंतच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासंदर्भात शाळेत झालेल्या बदलांची माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून देण्यात आली.त्यात प्रामुख्याने ११ बॅचचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल, शाळेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची माहिती, शाळेतील सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा निकाल, शाळेत होणाऱ्या विविध सह शालेय उपक्रमांची माहिती, शाळेच्या संकेतस्थळाची तसेच दीनदयाल एप्लीकेशनची माहिती तसेच शाळेविषयी इतर सर्व बाबींची माहिती ही पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून आदरणीय राज्यपाल महोदयांना देण्यात आली.तदनंतर आदरणीय राज्यपाल महोदयांनी “Quality Of Nation Is Depends Upon Education,And Quality Of Education Is Totally Depend Upon Teachers” या उक्तीप्रमाणे शिक्षकांना Quality Education संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच आदरणीय राज्यपाल महोदयांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व “Education Is The Basis Instrument Of National Purpose ” याप्रमाणे शिक्षणाचे महत्त्व याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by