11 AUGUST 2026
शाळेत To work best democracy needs a diversity of thoughts, ideas and expression. This is only possible with freedom and civility.या उक्तीप्रमाणे शालेय संसद निवडणूक ही प्रत्यक्ष मतदान पद्धतीने घेण्यात आली. मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवाराची एकाची वर्ग प्रतिनिधी व दुसऱ्याची उपवर्ग प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना याप्रसंगी लोकशाहीचे महत्त्व तसेच लोकशाही मधील लोकप्रतिनिधीचे कार्य व अधिकार याची माहिती देण्यात आली. ᗪEᗰOᑕᖇᗩᑕY is measured not by its leaders doing extraordinary things, but by its citizens doing things extraordinarily well As Well As My notion of DEMOCRACYis that under it the weakest should have the same opportunity as the strongest याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव देणे तसेच लोकशाही मध्ये आपण अप्रत्यक्षरित्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्याला हवा तो बदल करु शकतो हि भावना विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तसेच भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान या राज्याचे मा.राज्यपाल मा.श्री. हरिभाऊजी बागडे ( नाना ) यांच्या वाढदिवसानिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विद्यार्थ्यांना एक सामान्य व्यक्ती ते राज्यपाल या प्रवासामध्ये त्यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती देण्यात आली. तसेच Nothing is Impossible Due to Hardwork या उक्तीप्रमाणे आपले आयुष्य घडत असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे .
शाळेत नागपंचमी या सणानिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना नागपंचमी सण साजरा करण्यामागील कथा तसेच नागपंचमी सणाचे महत्त्व सांगण्यात आले .विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय सर्व सणांची ओळख व त्यामागील महत्त्व पटवून देणे हा हेतू ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे
शाळेत भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तसेच "हर घर तिरंगा 2026" या महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेअंतर्गत ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. "A true patriot is a person who deeply believes in the unity and integrity of India." याप्रमाणे याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वातंत्र्य दिनाबद्दलचे विचार भाषणरुपी मराठी ,हिंदी व इंग्रजी या भाषेतून मांडले. A strong nation is built on peace, strengthened by unity, and uplifted by spiritually awakened hearts. या उक्तीप्रमाणे तसेच हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध संगीत वाद्याच्या साह्याने विविध कवायत प्रकार सादरीकरण केले त्यात प्रामुख्याने लेझीम, झेंडा, घुंगुर काठी, रिंग, मास पी.टी. अशा विविध कवायत प्रकारच्या माध्यमातून विविध प्रतिकृती तयार केल्या त्यात कमळाचे फुल, भारतवर्ष, वायुसेनेचे सन्मानचिन्ह, ध्वजाच्या प्रतीकात्मक स्वरूपातील प्रतिकृती, अशोक चक्र अशा विविध प्रतिकृतीचा देखावा कवायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, समूहगीत व देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून शालेय परिसरातील वातावरण देशभक्तीमय केले .तसेच शासनाच्या हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत शाळेतील काही विद्यार्थ्यांनी देशभक्तांच्या वेशभूषा धारण करून शालेय परिसरात जनजागृती केली तसेच शाळेतील छंद वर्ग च्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांना आपली कर्तव्य व जबाबदारी यांची जाणीव बालवयातच करून देणे हा उद्देश ठेवून शाळेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.
शाळेत Management is doing things right, leadership is doing the right things याप्रमाणे व्यक्तीमत्व असणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील दांडगे यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील निबंध स्पर्धेत शाळेतील 100 % विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे .
शाळेत To work best democracy needs a diversity of thoughts, ideas and expression. This is only possible with freedom and civility.या उक्तीप्रमाणे शालेय संसद निवडणूक ही प्रत्यक्ष मतदान पद्धतीने घेण्यात आली. मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवाराची एकाची वर्ग प्रतिनिधी व दुसऱ्याची उपवर्ग प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना याप्रसंगी लोकशाहीचे महत्त्व तसेच लोकशाही मधील लोकप्रतिनिधीचे कार्य व अधिकार याची माहिती देण्यात आली. ᗪEᗰOᑕᖇᗩᑕY is measured not by its leaders doing extraordinary things, but by its citizens doing things extraordinarily well As Well As My notion of DEMOCRACYis that under it the weakest should have the same opportunity as the strongest याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव देणे तसेच लोकशाही मध्ये आपण अप्रत्यक्षरित्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्याला हवा तो बदल करु शकतो हि भावना विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या दोन महान व्यक्तींच्या जीवनावर आधारित आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित एकूण 09 नाट्यछटांचे सादरीकरण केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी या महान व्यक्तींच्या वेशभूषा धारण करून स्वतःमध्ये असलेल्या कलाविष्काराचे प्रदर्शन केले. तसेच त्यांच्या कार्याविषयी विविध प्रसंगांच्या माध्यमातून माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच Acting is magical,Change your look and your attitude, and you can be anyone विद्यार्थ्यांना व्यासपीठावर वेगवेगळ्या महान नेत्यांच्या भूमिका साकारण्याची संधी मिळावी व ऐतिहासिक वारश्याचे जतन करणे, विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनकार्याची माहिती देणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु शिष्यावर आधारित आंतरशालेय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते."The Mediocre Teacher Tells. The Good Teacher Explains. The Superior Teacher Demonstrates. The Great Teacher Inspires." या उक्तीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी महान अशा गुरु शिष्यावर आधारित एकूण 17 कथा ह्या पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर केल्या तसेच विद्यार्थ्यांना आदर्श अशा गुरु- शिष्याविषयी माहिती देण्यात आली.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा तसेच शिक्षणाबरोबर भारतीय सण,संस्कृती व परंपरा यांचे रक्षण करणे व गुरुपौर्णिमेच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणे , "Education is not preparation For life ,it is a Life" हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे हा मानस ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
शाळेत "𝐍𝐚𝐭𝐮𝐫𝐞 𝐈𝐬 𝐓𝐡𝐞 𝐀𝐫𝐭 𝐎𝐟 𝐆𝐨𝐝" या उक्तीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त वृक्ष दिंडी तसेच वारकरी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकऱ्याची तसेच विठ्ठल रखुमाई यांच्या वेशभूषा धारण केलेल्या होत्या. शालेय परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी व "Everything In Nature Invites Us Constantly To Be What We Are "हि भावना वाढीस लागावी म्हणून वृक्षदिंडी काढण्यात आली तदप्रसंगी भक्ती गीते व भजन गायनाने शालेय परिसराचे वातावरण भक्तीमय झाले. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी मागील पौराणिक कथा सांगण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळून व भक्तीगीताचे गायण करून आषाढी एकादशीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना विविध सणांची माहिती देणे तसेच आपला ऐतिहासिक वारसा जपणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..
शाळेत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याची तसेच कोल्हापूर संस्थानाची माहिती देण्यात आली. If you're a true warrior, competition doesn't scare you. It makes you better या वाक्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शाळेतील 100 % विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा तसेच 21 व्या शतकातील स्पर्धेला सामोरे जाण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे तसेच Dont Compare Yourself With Others No Can Play Yours Role Better Than You हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. Yoga Means Addition, Addition Of Energy, Strength And Beauty To Body, Mind And Soul या उक्तीप्रमाणे शाळेत विविध योगासने तसेच प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना त्यांचे फायदे समजावून सांगण्यात आले. त्यात प्रामुख्याने त्रिकोणासन, पादहस्तासन,ताडासन, सूर्यनमस्कार, वज्रासन, पुरक रेचक, अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी प्राणायाम तसेच शीतली प्राणायम इ. समावेश होता. त्याप्रसंगी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडुन विविध योगासने तसेच प्राणायामंचा सराव करुन घेण्यात आला.21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व तसेच योग व प्राणायामाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे तसेच लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम तसेच “Yoga Is A Journey Meet Yourself At Every Step” म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा मानस ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.
शाळेत "Every sunset is an opportunity to reset. Every sunrise begins with new eyes" याउक्तीप्रमाणे शाळेचा पहिला दिवस भारत माता पूजन तसेच बालब्रम्हाच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत म्हणजेच बालब्रह्माचे स्वागतही करण्यात आले. याप्रसंगी शाळेत वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती तसेच संविधानाचा अर्थही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आला. “Well beginning Is Half Done" तसेच शाळेत आनंददायी शिक्षण पद्धती राबविणे हा उद्देश ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्रे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांनी घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2026 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शाळेच्या आकराव्या बॅचचाही मागील सर्व बॅचप्रमाणे 100 % निकाल लागलेला आहे. "𝐒𝐮𝐜𝐜𝐞𝐬𝐬 𝐈𝐬𝐧𝐭 𝐉𝐮𝐬𝐭 𝐀𝐛𝐨𝐮𝐭 𝐑𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠 𝐀 𝐅𝐢𝐧𝐚𝐥 𝐃𝐞𝐬𝐭𝐢𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧, 𝐈𝐭'𝐬 𝐀𝐥𝐬𝐨 𝐀𝐛𝐨𝐮𝐭 𝐓𝐡𝐞 𝐉𝐨𝐮𝐫𝐧𝐞𝐲, 𝐓𝐡𝐞 𝐋𝐞𝐬𝐬𝐨𝐧𝐬 𝐋𝐞𝐚𝐫𝐧𝐞𝐝, 𝐀𝐧𝐝 𝐓𝐡𝐞 𝐆𝐫𝐨𝐰𝐭𝐡 𝐄𝐱𝐩𝐞𝐫𝐢𝐞𝐧𝐜𝐞𝐬 𝐀𝐥𝐨𝐧𝐠 𝐓𝐡𝐞 𝐖𝐚𝐲 " या वाक्याप्रमाणे शाळेने 100 % निकालाची परंपरा कायम राखत इ.10 वी चे सर्वच विद्यार्थी हे 70 टक्केपेक्षा जास्त म्हणजेच प्रथम श्रेणीच्या टक्केवारीने उत्तीर्ण झालेले असून, 75 टक्केपेक्षा जास्त म्हणजेच विशेष प्राविण्यसह 49 विद्यार्थी तर 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण संपादन करून 14 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
शाळेत महाराष्ट्र तसेच कामगार दिनानिमित्त ध्वजारोहणचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र तसेच कामगार दिनाची माहिती सांगण्यात आली तसेच ‘ ‘’Quality Is More Important Than Quantity’’ याउक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी वेळेचे तसेच कर्तव्याचे महत्व समजावुन सांगण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांच्या निकालाचे आयोजन देखील करण्यात आले.विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये वेळेचे महत्व समजावुन सांगणे तसेच ‘Well Begun Is Half Done‘ हा मानस ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.
शाळेत If You Can Dream It, You Can Do It या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना व्यापारी जीवनाचा तसेच व्यवहारिक जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून आनंदनगरी २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गट करून विविध खाद्यपदार्थाचे तसेच विविध खेळाचे एकूण ५१ स्टॉल लावले होते . विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबत व्यावहारिक जीवनामध्ये कसे वागावे ? नफा तोटा या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगणे तसेच एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींचा अनुभव देणे तसेच विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक क्षेत्राचा तसेच सृजनशक्तीचा विकास व्हावा तसेच “Believing in yourself is the first secret of success” हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे...
शाळेत भारतभुमी वरील सर्वात मोठ्या राज्याचे महामहिम मा.राज्यपाल तसेच पंडित दीनदाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे मा.अध्यक्ष मा.श्री.हरिभाऊजी बागडे नाना यांनी भेट देली. तदप्रसंगी महामहीम राज्यपाल महोदयांना रामचंद्र नाईक विद्यालयाच्या स्थापने पासुन ते आजपर्यंतच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासंदर्भात शाळेत झालेल्या बदलांची माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून देण्यात आली.त्यात प्रामुख्याने ११ बॅचचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल, शाळेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची माहिती, शाळेतील सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा निकाल, शाळेत होणाऱ्या विविध सह शालेय उपक्रमांची माहिती, शाळेच्या संकेतस्थळाची तसेच दीनदयाल एप्लीकेशनची माहिती तसेच शाळेविषयी इतर सर्व बाबींची माहिती ही पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून आदरणीय राज्यपाल महोदयांना देण्यात आली.तदनंतर आदरणीय राज्यपाल महोदयांनी "Quality Of Nation Is Depends Upon Education,And Quality Of Education Is Totally Depend Upon Teachers" या उक्तीप्रमाणे शिक्षकांना Quality Education संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच आदरणीय राज्यपाल महोदयांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व "Education Is The Basis Instrument Of National Purpose " याप्रमाणे शिक्षणाचे महत्त्व याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ” The science of today is the technology of tomorrow.“ या विचाराप्रमाणे आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग स्वतः तयार करून त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच कार्य समजावून सांगितले . यामध्ये एकूण इ.१ ली ते इ.९ वी पर्यंत प्रत्येक वर्गाचा एक याप्रमाणे १७ व वैयक्तिक स्वरूपाचे ४४ प्रयोग असे एकूण ६१ प्रयोग या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात मांडले होते.प्रत्येक गोष्टी मागं विज्ञान असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे व विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला प्रेरणा मिळावी हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र.
शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त "The best preparation for tomorrow is doing your best today" या वाक्याप्रमाणे वर्षभरामध्ये आयोजित विविध स्पर्धा तसेच उपक्रमांच्या वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या कार्याची महती सांगणारे मनोगत पर भाषणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारे शौर्य गीत देखील सादर केले. तर काही विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले .शाळेतील प्राथमिक, उच्च- प्राथमिक व माध्यमिक या तीन विभागातुन एक स्टुडन्ट ऑफ द इयर २०२५-२६ या शाळेतील मुख्य पुरस्काराचे वितरणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेत १०० % उपस्थित असणाऱ्या एकुण ९७ विद्यार्थ्यांना १०० % उपस्थितीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले."Keep your face always toward the sunshine and shadows will fall behind you" तसेच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार करणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील एका निवडक क्षणाचे क्षणचित्र .
शाळेत शाळेच्या इ.१० वी च्या अकराव्या बॅचच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . त्याप्रसंगी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना तसेच शाळेने त्यांच्याविषयी जोपासलेल्या सर्व संस्कारांना मनोगताच्या माध्यमातून उजाळा दिला ."The best memories of our life can never be captured in pictures, they are always captured by heart" तसेच त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते इ.१० वी पर्यंतच्या त्यांच्या प्रवासाची चित्रफित दाखविण्यात आली व शाळेने कशाप्रकारे त्यांच्या आठवणी तसेच बालपण जपून ठेवले आहेत याची त्यांना आठवण करून दिली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री राजेंद्र पवार सर व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.त्यातील एका निवडक क्षणाचे छायाचित्र.
संस्कार केंद्रात क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना थोर समाज सुधारक क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या विषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना भारतीय समाज सुधारकांची माहिती देणे तसेच “ Education Is the Basic Instrument Of National Purpose “ हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला.त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे
शाळेत पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वैयक्तिक खेळामध्ये इ.१ ली ते इ.४ थी साठी १०० मीटर धावणे व इ.५ वी ते इ.८ वी साठी -तीन पायाची शर्यत हे खेळ दि.११.०२.२०२६ रोजी घेण्यात आले.”Life is more fun if you play games” तसेच “Learning By Doing” याप्रकारचे मूल्य विद्यार्थ्यात रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना वाढावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात खेळाचे महत्व पटवून देणे, शरीर हीच संपत्ती आहे तसेच खेळाचे आपल्या दैनंदिन जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून पटवून देणे हा मानस ठेवून शाळेने विविध खेळाचे आयोजन केले आहे. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे.