“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचे तसेच विविध उपक्रमांचे आयोजन ….

15 AUGUST 2026

शाळेत भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तसेच “हर घर तिरंगा 2026” या महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेअंतर्गत ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. “A true patriot is a person who deeply believes in the unity and integrity of India.” याप्रमाणे याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वातंत्र्य दिनाबद्दलचे विचार भाषणरुपी मराठी ,हिंदी व इंग्रजी या भाषेतून मांडले. A strong nation is built on peace, strengthened by unity, and uplifted by spiritually awakened hearts. या उक्तीप्रमाणे तसेच हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध संगीत वाद्याच्या साह्याने विविध कवायत प्रकार सादरीकरण केले त्यात प्रामुख्याने लेझीम, झेंडा, घुंगुर काठी, रिंग, मास पी.टी. अशा विविध कवायत प्रकारच्या माध्यमातून विविध प्रतिकृती तयार केल्या त्यात कमळाचे फुल, भारतवर्ष, वायुसेनेचे सन्मानचिन्ह, ध्वजाच्या प्रतीकात्मक स्वरूपातील प्रतिकृती, अशोक चक्र अशा विविध प्रतिकृतीचा देखावा कवायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, समूहगीत व देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून शालेय परिसरातील वातावरण देशभक्तीमय केले .तसेच शासनाच्या हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत शाळेतील काही विद्यार्थ्यांनी देशभक्तांच्या वेशभूषा धारण करून शालेय परिसरात जनजागृती केली तसेच शाळेतील छंद वर्ग च्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांना आपली कर्तव्य व जबाबदारी यांची जाणीव बालवयातच करून देणे हा उद्देश ठेवून शाळेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by