रामचंद्र नाईक विद्यालयाचे अभिमानाचे २५ वर्ष..    25th YEARS OF THE PRIDE OF RAMCHANDRA NAIK SCHOOL

छत्रपती संभाजीनगर ते सृष्टी ऍग्रो टुरिझम या ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन

16 DECEMBER 2023

शाळेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजीनगर ते सृष्टी ऍग्रो टुरिझम सेंटर याठिकाणी सहलीचे आयोजन केले होते .विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचा अनुभव देणे, आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे, भौगोलिक परिस्थितीची सखोल माहिती देणे, विद्यार्थ्यांमध्ये प्रवासाचे कौशल्य विकसित करणे इ. गोष्टींचा विचार करून सहलीचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विद्यार्थ्यांना याप्रसंगी आपल्या समाजातील Community Helper बद्दल माहिती देऊन त्यांच्या कामाचे स्वरूप याबद्दल प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला व ती आपल्या साठी कसे महत्त्वाचे आहेत हे पटवून देण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध असलेला रेनडान्स चा मनसोक्त आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके जसे की बैलगाडी फेरी, आगगाडी फेरी, मनोरंजनात्मक खेळ असणारे विविध प्रात्यक्षिक स्वतः करून आनंद घेतला. तद नंतर विद्यार्थ्यांनी निसर्ग भोजनाचा एकत्रित आनंद घेतला.त्यातील काही क्षणाचे छायाचित्रे.

News & Events

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by