रामचंद्र नाईक विद्यालयाचे अभिमानाचे २५ वर्ष..    25th YEARS OF THE PRIDE OF RAMCHANDRA NAIK SCHOOL

शाळेच्या‌ रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ” आपले कुटूंब ” ही थीम असणाऱ्या २५ व्या (सत्र -१) वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन..

4 FEBRUARY 2024

शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या अंतर्गत ” आपले कुटूंब ” ही थीम असणाऱ्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र पहिले हे नर्सरी ते इ.१ ली या वर्गासाठी संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १५ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपले कुटूंब या थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच कौटुंबिक संदेशपर नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे

News & Events

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by