रामचंद्र नाईक विद्यालयाचे अभिमानाचे २५ वर्ष..    25th YEARS OF THE PRIDE OF RAMCHANDRA NAIK SCHOOL

शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत आपले कुटूंब ही थीम असणाऱ्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र – तिसरे चे आयोजन

05 FEBRUARY 2024

शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष अंतर्गत आपले कुटूंब ही थीम असणाऱ्या २५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सत्र – तिसरे हे इ.६ वी ते इ .९ वी या वर्गासाठी संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण १७ सादरीकरणांचा समावेश होता त्यात प्रामुख्याने आपली आपले कुटूंब ही थीम असणाऱ्या बोधात्मक गीतांचा तसेच कौटुंबिक तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या नाट्यछटांचा समावेश करण्यात आला होता.याच कार्यक्रमात सन २०२२- २३ मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमधील पहिल्या दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे सन्मानचिन्ह ,इ.१० वी ची सनद तसेच पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  तसेच इ.९ वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “प्रगतीच्या पाऊलखुणा” असे शिर्षक असलेल्या हस्तलिखिताचे विमोचन देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या व्यासपीठ कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थ्यांमधील  असलेल्या  सुप्त गुणांना चालना मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यामधील असलेल्या कलेची जाण त्यांना करून देणे इ. गोष्टींचा विचार करून शाळेने या २५ व्या  वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. त्यातील काही निवडक क्षणांचे क्षणचित्रे.

News & Events

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by