रामचंद्र नाईक विद्यालयाचे अभिमानाचे २५ वर्ष..    25th YEARS OF THE PRIDE OF RAMCHANDRA NAIK SCHOOL

शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिनाचे आयोजन..

1 OCTOBER 2023

शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच रामचंद्र नाईक विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिमानाचे २५ वर्ष या थीम अंतर्गत स्वच्छ्ता ही सेवा या भारत सरकारच्या अभियानांतर्गत कचरा मुक्त भारत बनविण्यासाठी सामूहिक महाश्रमदान स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता दिनाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी शाळेतील शिक्षक , विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मिळून स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शालेय परिसर प्रातिनिधिक स्वरूपात स्वच्छ केला.तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी या दोन महापुरुषांच्या वेशभूषा हुबेहूब साकारल्या होत्या. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे तसेच शालेय जीवनात स्वतःची कामे स्वतः करावी , आपल्या दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण आहे तसेच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगी काराव्यात इ. सवयी विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच रुजाव्या हा उद्देश ठेवून शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यातील एका क्षणाचे छायाचित्र.

News & Events

© Copyright 2024 - Ramchandra Naik School | Designed by