“Intelligence plus character that is the goal of true education.” – Dr. Martin Luther King Jr

शाळेत “आनंददायी शनिवार” या उपक्रमांतर्गत “दप्तर मुक्त शाळा” तसेच शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती रंगविण्याच्या कार्यशाळेचे तसेच विविध खेळांचे आयोजन…

12 SEPTEMBER 2026

शाळेत “The learner should be actively involved in the learning process” या उक्तीप्रमाणे “आनंददायी शनिवार” या उपक्रमांतर्गत तसेच गणेश चतुर्थी निमित्त शाडूच्या मातीपासून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती रंगविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. तसेच आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विविध खेळांचे आयोजन देखील करण्यात आले होते .त्यात प्रामुख्याने “दप्तर मुक्त शाळा” तसेच विद्यार्थ्यांना आनंद देणाऱ्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या विविध रंगांच्या रंगसंगतीची माहिती देणे. आपण तयार केलेली श्री ची मूर्तीच आपण आपल्या घरी बसवणार ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी तसेच Creative thinking is NOT A TALENT, it is a skill that can be learned and practiced हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला. याप्रसंगी शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. त्यातील काही निवडक क्षणांचे छायाचित्रे..

News & Events

© Copyright 2026 - Ramchandra Naik School | Designed by